Home Breaking News रा. काँँ.पार्टी सा.न्याय विभागाच्या जिल्हा सरचिटणीस पदी लक्ष्मण सुरनर यांची निवड..

रा. काँँ.पार्टी सा.न्याय विभागाच्या जिल्हा सरचिटणीस पदी लक्ष्मण सुरनर यांची निवड..

244
0

रा. काँँ.पार्टी सा.न्याय विभागाच्या जिल्हा सरचिटणीस पदी लक्ष्मण सुरनर यांची निवड..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदी मुखेड तालुक्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण सुरनर यांची निवड करण्यात आली आहे.

फुले,शाहू,शिवाजी महाराज,आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारावर पद्मविभूषण आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाची ध्येय – धोरणे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे मा.जयदेव अण्णा गायकवाड यांच्या आदेशाने मा. पंडितराव कांबळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे नांदेड जिल्हाध्यक्ष कपिल कांबळे जुन्नेकर यांच्या हस्ते निवड करण्यात आली आहे.अशी माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष कपिल कांबळे जुन्नेकर यांनी दिली आहे. यावेळी अण्णासाहेब जाहिरे, राजू शिंदे जुन्नेकर, शिवाजी कबनुरकर, नितीन वाघमारे गोजेगावकर यांच्या सह अदी जण उपस्थित होते.

Previous articleप्रहार तालुका उपाध्यक्ष पदी बालाजी राठोड यांची निवड…
Next articleदेशात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना मिळेल मोफत करोना लस – केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here