Home Breaking News देशात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना मिळेल मोफत करोना लस – केंद्रीय मंत्री...

देशात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना मिळेल मोफत करोना लस – केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

138
0

देशात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना मिळेल मोफत करोना लस – केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

दिल्ली, दि. २५ – १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे.
“१ मार्चपासून ६० पेक्षा जास्त वय असणारे नागरिक तसंच इतर व्याधी असणाऱ्या ४५ हून अधिक वयाच्या नागरिकांचं लसीकरण केलं जाणार,” असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे.
“१० हजार सरकारी आणि २० हजार खासगी केंद्रांवर ही लसीकरण मोहीम पार पडणार आहे.
तसंच ही लस मोफत दिली जाणार असून सर्व खर्च केंद्र सरकार उचलणार,” असल्याचंही प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे.
प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितलं की, “ज्यांना खासगी रुग्णालयातून लसीकरण करुन घ्यायचं आहे त्यांना पैसे भरावे लागतील.
यासाठी किती पैसे मोजावे लागतील याचा निर्णय आरोग्य मंत्रालय पुढील तीन ते चार दिवसांत घेईल.
आरोग्य मंत्रालयाची यासंबंधी रुग्णालयं आणि लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांसोबत चर्चा सुरु आहे”.
दरम्यान करोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकारकडून तीन सदस्यीय पथकं पाठवण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.

महाराष्ट्रासहित केरळ, गुजरात, पंजाब, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीरमध्ये ही पथकं पाठवण्यात आली असून करोनाशी लढण्यात मदत करणं हा मुख्य हेतू आहे.

पी.टी.आय.च्या वृत्तानुसार,
या पथकांचं नेतृत्व आरोग्य मंत्रालयातील सहसचिव-स्तरीय अधिकारी करणार आहेत.

Previous articleरा. काँँ.पार्टी सा.न्याय विभागाच्या जिल्हा सरचिटणीस पदी लक्ष्मण सुरनर यांची निवड..
Next articleमैत्रीपूर्ण क्रिकेट स्पर्धा २०२१ चे मानकरी वडगांव पोलीस स्टेशनचा प्रथम क्रमांक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here