• Home
  • मैत्रीपूर्ण क्रिकेट स्पर्धा २०२१ चे मानकरी वडगांव पोलीस स्टेशनचा प्रथम क्रमांक

मैत्रीपूर्ण क्रिकेट स्पर्धा २०२१ चे मानकरी वडगांव पोलीस स्टेशनचा प्रथम क्रमांक

मैत्रीपूर्ण क्रिकेट स्पर्धा २०२१ चे मानकरी वडगांव पोलीस स्टेशनचा प्रथम क्रमांक

वडगांव : वडगांव नगरपरिषद वडगांव आयोजित मैत्रीपूर्ण क्रिकेट स्पर्धा २०२१
मध्ये आज छत्रपती शाहू मैदान वडगांव येथे फायनल सामना
डॉक्टर असोसिएशन वडगांव विरूध्द पोलीस स्टेशन पेठ वडगांव यांच्या मध्ये झाला या सामन्यात वडगांव पोलीस संघाने निर्विवाद वर्चस्व राखत सामना एकहाती जिंकला
तसेच पत्रकार संघ वडगांव व नगरपालिका कर्मचारी अ संघामध्ये झालेल्या सामन्यात वडगांव नगरपालिका संघाने विजय मिळवून तृतीय क्रमांक पटकावला प्रथम,द्वितीय,तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळवलेल्या संघाचे त्याच बरोबर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक विकेट व मॅन ऑफ द सिरीज मिळालेल्या सर्व खेळाडूंचे वडगांव पालिकेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष मोहनलाल माळी ,उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण ,नगरसेविका शमशुद्धीन कवठेकर भाभी,नगरसेवक संदीप पाटील , भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाअध्यक्ष मोहन शिंदे , पत्रकार संजय दबडे , नाना जाधव ,सतोंष माळवदे, सचिन पाटील ,अभिनदंन सालपे व पालिकेचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी व डाँक्टर्स असोसिएशन सदस्य उपस्थित होते.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment