• Home
  • बहिरेवाडी येथे भैरोबा तालीम मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीर

बहिरेवाडी येथे भैरोबा तालीम मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीर

 

कोल्हापूर  : संपूर्ण पन्हाळा तालुक्यात रक्तदानामधे आपली नवी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या  आणि तरुणांच्या एकीचं प्रतिक असणाऱ्या  बहिरेवाडी ता.पन्हाळा येथील भैरोबा तालीम मंडळाच्या वतीने शिवजयंती या पवित्र दिनी रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं.
रक्तदान शिबीराचं हे पाचवं वर्षं होतं.या रक्तदान शिबीरामधे जमलेल्या कार्ड मुळे वर्षभर बहिरेवाडी आणि परिसरातील रुग्णांना शासकीय रक्तपेढीमधून रक्ताच्या बाटल्या मोफत मिळत असतात.त्यामुळे या रक्तदान शिबीरास उत्सफूर्त प्रतिसाद मिळत असतो.
या रक्तदानास मिरज शासकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीचं दरवर्षी सहकार्य मिळतं.
या रक्तदान प्रसंगी बहिरेवाडी गावचे सरपंच शिरीषकुमार जाधव,प्रदिप चव्हाण,भैरैबा तालीम चे अध्यक्ष प्रविण जाधव,उपाध्यक्ष खजिनदार दिग्विजय जाधव,डॉ.अभिजीत जाधव,गणेश जाधव,पुष्पसेन जाधव,रोहित जाधव आणि भैरोबा तालीम तरुण मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

युवा मराठा न्युज नेटवर्क.

anews Banner

Leave A Comment