Home माझं गाव माझं गा-हाणं जाती आधारित जनगणनेमुळे जातीयता वाढणार नाही तर प्रत्येक जातीला त्यांच्या संख्येनुसार वाटा...

जाती आधारित जनगणनेमुळे जातीयता वाढणार नाही तर प्रत्येक जातीला त्यांच्या संख्येनुसार वाटा मिळेल – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

118
0

राजेंद्र पाटील राऊत

 

जाती आधारित जनगणनेमुळे जातीयता वाढणार नाही तर प्रत्येक जातीला त्यांच्या संख्येनुसार वाटा मिळेल – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून नाही तर स्वतंत्र प्रवर्गाद्वारे आरक्षण देण्याची रिपाइं ची मागणी                                                                                                                         (वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)

पालघर दि. २१ – मराठा समाजाला एस सी एस टी ओबीसींच्या कोट्यातून नाही तर स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण द्यावे अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. सवर्ण समाजातील गरिबांना 10 टक्के आरक्षण देण्याचा कायदा केंद्र सरकार ने केला आहे. त्यात आता जोड देऊन देशातील मराठा ; राजपूत आदी क्षत्रिय समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा कायदा संसदेत करावा अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली असल्याचे सांगत आगामी जण गणना ही जाती आधारित करावी; जातीनिहाय जनगणनेमुळे जातीयता वाढणार नाही तर प्रत्येक जातीला त्यांच्या संख्येनुसार न्याय वाटा मिळेल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. विक्रमगड च्या दिवेकर वाडी येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आदिवासी बहुजन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात ना. रामदास आठवले यांनी मागर्दशन केले. यावेळी कुणबी सेने चे अध्यक्ष विश्वनाथ पाटील; रिपाइं चे सुरेश बारशिंग; रिपाइं पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव ;चंद्रशेखर कांबळे; राम जाधव; सतीश बोर्डे; नंदा मोरे; तेजश्री मोरे; इंदिरा दोंदे;साक्षी बोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालघर तालुक्यात 8 तालुके दुर्गम आहेत.त्यातील एक विक्रमगड तालुका आहे. या भागात पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न आहे.येथे मनरेगा चे काम केलेल्या आदिवासींना राज्य सरकार मे अद्याप वेतन दिलेले नाही ही चुकीची बाब आहे.राज्यातील महाविकास आघाडी चे सरकार काही कामाचे नाही.. उधवजींचे सरकार नाही रामाचे .. नाही भिमाचे .. नाही काही कामाचे असे ना रामदास आठवले म्हणाले.
पालघर जिल्ह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन आणि आदिवासी भवन उभारण्याची मागणी होत असून त्याच्या पूर्ततेसाठी आपण प्रयत्न करणार असे आश्वासन ना.रामदास आठवले म्हणाले. येत्या दि. 25 फेब्रुवारीला संपूर्ण देशात गरीब भूमिहीनांसाठी 5 एकर जमीन देण्यात यावी या मागणीसाठी रिपाइं तर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ना रामदास आठवले यांनी दिली.

आरपीआय आणि कुणबी सेना एकत्र अली तर भविष्यात राज्यात मोठी सामाजिक आणि राजकीय क्रांती होईल असे प्रतिपादन यावेळी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here