• Home
  • नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख १५ हजार ७३१ रुग्ण कोरोनामुक्त सद्यस्थितीत १ हजार ७३१ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख १५ हजार ७३१ रुग्ण कोरोनामुक्त सद्यस्थितीत १ हजार ७३१ रुग्णांवर उपचार सुरू

राजेंद्र पाटील राऊत

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख १५ हजार ७३१ रुग्ण कोरोनामुक्त

सद्यस्थितीत १ हजार ७३१ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक, दि.२१ फेब्रुवारी, २०२१ (दिलीप चव्हाण ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ७९० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १ हजार ७३१ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ४५, चांदवड १४, सिन्नर ५५, दिंडोरी ३९, निफाड ९६, देवळा १९, नांदगांव ५२, येवला २७, त्र्यंबकेश्वर ३६, सुरगाणा ०९, पेठ ०२, कळवण १५, बागलाण २८, इगतपुरी १४, मालेगांव ग्रामीण ३४ असे एकूण ४८५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार २०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २०७ तर जिल्ह्याबाहेरील १९ असे एकूण १ हजार ७३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख १९ हजार ६०६ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९६.२७ टक्के, नाशिक शहरात ९७.३८ टक्के, मालेगाव मध्ये ९२.१६ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.८९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.८१ इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण ८२१ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ३३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७६ व जिल्हा बाहेरील ५५ अशा एकूण २ हजार ८५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :

◼️१ लाख १९ हजार ६०६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख १५ हजार ७३१ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १ हजार ७३१ पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.८१ टक्के.

 

anews Banner

Leave A Comment