• Home
  • पेट्रोल दरवाढ विरोधात काँग्रेसचे पेठ वडगांवात आंदोलन.* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज.*

पेट्रोल दरवाढ विरोधात काँग्रेसचे पेठ वडगांवात आंदोलन.* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज.*

*पेट्रोल दरवाढ विरोधात काँग्रेसचे पेठ वडगांवात आंदोलन.*

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज.*

गुरुवार, 25 जून 2020

केंद्रातील मोदी सरकारने इंधनाच्या दरात प्रचंड दरवाढ केली आहे. भविष्यात असेच ईंधन दरवाढ होत राहिले तर नागरिकांना गरजेपुरते थेंब थेंब, किंवा 50 मिली किंवा 100 मिली असे पेट्रोल घ्यावे लागेल.

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात वडगांव शहर काँग्रेसच्या वतीने आज गुरुवारी आंदोलन करण्यात आले.

पेट्रोल डिझेल, ईंधन दरवाढीच्या निषेधार्थ आज रोजी वडगांव शहर काँग्रेस च्या वतीने शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कपील पाटील,सुरज जमादार,किरण पाटील,नितीन सणगर,भावेश जाधव,सुनिल सलगर,सुशांत जाधव,सुकुमार रावळ,नितीन पिसे,राहुल माने,राजू माने,रुपेश वडर, अजित लोहार,मारुती माने,रमेश कांबळे,दीपक सावर्डेकर,देवा एडके यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलच्या किंमती कमी होऊनही भारतात मात्र चढ्या दरानेच पेट्रोलची विक्री केली जात आहे. त्यात रोजच्या रोज वाढ होत आहे. हीच स्थिती कायम राहिली तर भविष्यात वाहनधारकांना पिचकारीने पेट्रोल भरावे लागेल. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने पेट्रोलच्या किंमती कमी कराव्यात, अन्यथा भविष्यात कॉग्रेस वतीने उग्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
वडगांव शहर अध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले, की केंद्रातील मोदी सरकारने इंधनाच्या दरात प्रचंड दरवाढ केली आहे. भविष्यात असेच ईंधन दरवाढ होत राहिले तर नागरिकांना गरजेपुरते थेंब थेंब, किंवा 50 मिली किंवा 100 मिली असे पेट्रोल घ्यावे लागेल म्हणून आज रोजी दुचाकीस्वाराना प्रतीकात्मक थेंब थेंब पेट्रोल वाटप करत उपरोधिक आंदोलन करण्यात आले.

2014 साली मोदी सरकारने 30 ते 35 रुपये दरात पेट्रोल देऊ म्हणून आश्वासन दिले होते. पण आज पेट्रोलचे दर 79.76 रुपये, डिझेल चे दर 79.88 रुपये झाले आहेत. गेल्या दहा ते पंधरा दिवसात नऊ वेळा पेट्रोल डिझेल, इंधनाच्या दरात वाढ केली आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना लाखो रुपये फायदा होत आहे. वास्तविक पाहता जागतिक बाजारपेठेत इंधनाचे प्रती बॅरेल चे दर चाळीस डॉलर इतके ऐतिहासकरित्या कमी झाले आहेत. तेच दर 2014 साली काँग्रेस सरकारच्या काळात एकशे दहा ते एकशे चाळीस बैरल प्रति बॅरेल च्या आसपास होते. जनतेला वाटले की आत्ता पेट्रोल डिझेल, इंधनाचे दर कमी होतील पण केंद्र सरकार इंधनाचे दर कमी करण्याऐवजी इंधनावर कर वाढवून दरवाढ करत आहे. संपूर्ण देशात एकीकडे कोरोनाचा कहर सुरु असुन उद्योगधंदे ठप्प आहेत, रोजगाराचा पत्ता नाही, महागाई प्रचंड वाढली, शेतीमालाला बाजारपेठ व भाव नाही, देशातील सप्लाय चेन आधीच अडचणीत असुन या ईंधन दरवाढी मुळे वाहतूक दरात वाढ होऊन अजुन प्रचंड महागाई वाढणार आहे. रोजगार नसल्यामुळे जनतेचा खिसा खाली असून केंद्र सरकार ईंधन दरवाढ करुन जनतेला लूटत आहे. या दरवाढी मुळे गोरगरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य जनतेचे जगणे कठिण झाले असुन ईंधन दरवाढ कमी करावी म्हणून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करुन ईंधन दरवाढ कमी करावी अशी मागणी करत आहोत. यावेळी कॉग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदि उपस्थित होते.

 

anews Banner

Leave A Comment