• Home
  • शासनाकडून मिळणार पशुपालकाना प्रोत्साहनपर पाच हजार रू.अनुदान.* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज .*

शासनाकडून मिळणार पशुपालकाना प्रोत्साहनपर पाच हजार रू.अनुदान.* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज .*

*शासनाकडून मिळणार पशुपालकाना प्रोत्साहनपर पाच हजार रू.अनुदान.*

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज .*

*कोल्हापूर,* दि. 25 : सर्वसमावेशक अनुवंशिक सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील गायी-म्हशींची उत्पादकता वाढविणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशु-पालकांनी 30 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाय.ए.पठाण यांनी केले आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश गायी-म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच या योजनेमार्फत जन्मलेल्या (प्रथम F-1) मादी वासरास शासनाकडून प्रोत्साहनपर 5 हजार रूपयाचे अनुदान व व्दितीय F-2 जन्मलेल्या जातिवंत नर वासरास शासन खरेदी करणार आहे. जास्तीत-जास्त पशुपालकांनी आपल्या जातिवंत गायी व म्हशींची नाव नोंदणी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करून 30 जूनपर्यंत करावी, असेही श्री. डाॅ.वाय.ए.पठाण यांनी कळविले आहे.

.. .. .. ..

anews Banner

Leave A Comment