Home गडचिरोली रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून ‘शिवकल्याण युथ मल्टिपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन’ या...

रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून ‘शिवकल्याण युथ मल्टिपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन’ या सामाजिक संस्थेचा लोकार्पण सोहळा संपन्न.

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220608-WA0027.jpg

रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून ‘शिवकल्याण युथ मल्टिपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन’ या सामाजिक संस्थेचा लोकार्पण सोहळा संपन्न.

आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश काँग्रेस महासचिव यांच्या हस्ते पार पडला लोकार्पण सोहळा.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क//  सामाजिक उत्तरदायित्व व समाजात नवीन बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करनाऱ्या होतकरू तरुणांनी एकत्र येत शिवकल्याण युथ मल्टिपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन या नव्या अशासकीय व अराजकीय संस्थेची स्थापना केली असून या संस्थेचा लोकार्पण सोहळा आमगाव (म.) येथे आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते व दैनिक पुण्यनगरी चे जिल्हा प्रतिनिधी प्रल्हाद मशाखेत्री, आमगाव (म.) च्या सरपंच जोसना गव्हारे, वालसरा चे सरपंच अरुण मडावी, विसापूरचे उपसरपंच काशीनाथ बुरांडे , किशोर कोहळे शिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
संस्थेच्या पहिल्या कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून अनुप कोहळे, उपाध्यक्ष अविनाश आचला, सचिव प्रवीण चलाख, सह सचिव संतोषी सुत्रपवार, कोषाध्यक्ष निहाल शेळकी, सदस्य प्रेरित कोठारे, जितेश शेट्टीवार यांची निवड करण्यात आली.
यावेळी 20 रक्तदात्यांनी रक्तदान केले, 122 लोकांनी नेत्र तपासणी, 100 हुन अधिक लोकांनी BP, सुगर चा सुद्धा चेकअप करून घेतला.
संस्थेच्या नावातच शिवकल्याण असल्याने ही संस्था निश्चितच शिवरायांना अपेक्षित जनसामान्यांच्या कल्याणाकरिता कार्य करेल असा विश्वास आमदार डॉ.देवराव होळी यांनी व्यक्त करत संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संस्थेने आपल्या उद्देशाने प्रमाणे पहिल्याच दिवशी आरोग्य व रक्तदान शिबीर घेऊन जिल्ह्यातील युवकांसाठी आदर्श निर्माण केला आहे, अश्याच पद्धतीने इतरही युवकांनी स्वतः पुढे येऊन समाज कार्यात आपले योगदान द्याव्हे असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी उपस्थितांना केले.
यावेळी हरबाजी मोरे, वसंत राऊत, सीताराम गावतुरे, प्रतिक राठी, वसंत कोहळे, लोमेश सातपुते, संदीप कोपुलवार, किशोर पोहणकर, अमित भांडेकर, श्रेयस तावाडे, किशोर पोहणकर, रोशन कोहळे, देविदास कोहळे, बंडू शेट्टीवार सह अनेक मान्यवर व मोट्या संख्येनी गावातील युवक, शिबीरार्थी उपस्थित होते.
अतुल दुधबळे, प्रतीक घारगावे, आकाश बरलावार, निखिल शेट्टीवार, अविनाश टोरे, प्रशांत गव्हारे, आकाश मूलकलवार, आकाश वासेकर, भोजराज भांडेकर, प्रकाश चीचघरे, भूषण कारडे, आशिष कारडे, गजानन कुनघाडकर, सुनील भुरसे, नीरज कोहळे, गणराज चीचघरे, रोशन गट्टीवार, रोशन कोहळे, मदन धोती, मंथन कुनघाडकर यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाची प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अनुप कोहळे यांनी केले. सूत्रसंचालन सहसचिव संतोषी सुत्रपवार तर आभार किशोर पोहणकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here