Home गडचिरोली 25 वर्षाच्या आयुष्यात देश,धर्म,जल,जंगल,जमीन,धर्मातरन,जनजाती संस्कृती करीता लढा देत भारतमाते करीता विरशहिद “””भगवान...

25 वर्षाच्या आयुष्यात देश,धर्म,जल,जंगल,जमीन,धर्मातरन,जनजाती संस्कृती करीता लढा देत भारतमाते करीता विरशहिद “””भगवान बिरसा मुंडा”” यांच्या 9 जुन या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20220608-WA0023.jpg

25 वर्षाच्या आयुष्यात देश,धर्म,जल,जंगल,जमीन,धर्मातरन,जनजाती संस्कृती करीता लढा देत भारतमाते करीता विरशहिद “””भगवान बिरसा मुंडा””
यांच्या 9 जुन या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
“””””””””””””””””””””””””””””””””””
प्रकाश गेडाम,गडचिरोली
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””
आपल्या 25 वर्षाच्याा आयुष्यात देश,धर्म,जल.जंगल.जमीन,आदिवासींचे धर्मातरन,जनजाती संस्कृती या करीता तिव्र संघर्ष करत भारतमाते करीता शहिद झालेला देशभक्त शहिद शुरविर “”भगवान बिरसा मुंडा””” यांचा जन्म 15 नोव्हेंबर,1875 ला झाला व 9 जुन,1900.ला भारतमाते करीता शहिद झाले. बिरसा मुंडा च शिक्षण 1886 ते 1890 पर्यंत ईसाई मिशन स्कुल मध्ये झाल

.जनजाती/आदिवासी ची पुजा अर्चा ,धार्मीक विधि करीता ची राखीव जमीन व जंगल असतो या स्थळा बाबत आदिवासी फारच संवेदनशील असतात अश्यीच जनजाती धार्मीक विधिची जमीन व जंगल ख्रिश्चन फादर नोट्रोट ने ईसाई मशनरी ला द्यावे या ईसाई च्या मागनीला तथा प्रस्तावाला बिरसा मुंडानी प्रखर विरोध केला.त्या मुळे ईसाई ने बिरसाला ईसाई शाळेतुन काळुन दिले.त्या वेळी बिरसाला कडले की इंग्रज व सेवेच्या नावावर गरीब जनजाती च धर्मांतरन करनारे ईसाई एकच आहेत
.भगवान बिरसा मुंडा म्हणतात अबुवा राज ऐटे जना ओरी महारानी राज टन्डक जना ” म्हनजे आपले राज्य येत आहे इंग्रजाच राज्य समाप्त होत आहे अश्या पध्दतीने जनजाती/आदिवासी ना समजवुन बिरसानी इंग्रज व ईसाई सोबत संघर्ष सुरु केला.6 आँगस्ट,1895. ला बिरसाला अटक करन्यात आले.तथा बिरसाला इंग्रजांनी वेडा गुन्हेगार ठरवले मात्र राजर्स या चिकित्सकानी सांगीतले बिरसा वेडा नाहि.रांचीचे न्यायधिश काली क्रिष्ण मुखर्जी ने बिरसाला निर्दोश मुक्त केले.19 नोव्हेंबर,1895.ला इंग्रज डेप्युटी कमिश्नरनी बिरसाला 2 वर्षाची सजा दिली
.30 नोव्हेंबर,1897 ला सजा भोगुन आल्यावर बिरसा नी”उलगुलान” म्हनजे क्रांती,उठाव,बंड पुकारले व जुन्या कार्यकर्ते याना “प्रचारक”,कुटुंब वत्सल कार्यकर्ते ना “पुराणक” व नविन कार्यकर्ते ना “नानक” अशी नावे देउन क्रांती सेना तयार केली
उलगुलान’ ची सुरवात 24 डिसेंबर,1899.ला केली व पोलीस चौकी,गिरीजाघर,गो-या अधिकारी यांच्या क्लबवर हल्ला केला.व आपल्या क्रांती सेनेला आदेश दिले ” हे राम्बडा रे केच्चे केच्चे पुंडी राम्बडा रे केच्चे ” म्हनजे गो-या व काळ्या इंग्रजाना कापुन काढा
7 जानेवारी,1900. ला खुंटि पोलीस चौकीला बिरसा.सेनेने पेटवुन दिले.कपट नितीने भगवान बिरसा ला पकडुन रांचिच्या तुरुंगात बंद केले 9 जुन,1900 ला इंग्रजानी म्रुत घोषीत केले.25 वर्षात बिरसा ने आपल अमुल्य योगदान भारतमाते करीता दिले
इंग्रजांनी 482 मुंडा जनजाती/आदिवासी वर खटला चालविला न्यायधिश नी 3 मुंडा आदिवासी ना फाशीची शिक्षा दिली.44 मुंडा जनजाती ना काडापाणी ची शिक्षा दिली…47 मुंडा आदिवासी ना 3 वर्षाची शिक्षा दिली

भगवान बिरसा मुंडा च्या आंदोलना मुडे इंग्रजाना खालील प्रमाणे कायदे करावे लागले

1)1900 छोटा नागपूर भागात जमीनसुधारना कायदा लागु केला.कलेक्टर च्या अनुमती शिवाय आदिवासी च्या जमीनीच्या हस्तांतरना स मनाई केली
2)बैढबिगार पध्दती बंद केली
3)1902 ला जनजाती/आदिवासी करीता गुमला सब डिव्हिजन निर्मान केले
4)1908 ला टेनन्सी एक्ट पास केला
5)1889 चा भुमीसेटलमेंट अधिनियम आदिवासी मुंडा क्षेत्रात लागु केला
6)इम्प्रुबमेंट सोसायटि ऐक्ट 1916. अन्वये शासकीय सेवेत व लोकप्रतिनिधी मध्ये जनजाती/आदिवासीना आरक्षण लागु केले

भगवान बिरसा मुंडा यांच्या आंदोलना मुळे स्वतंत्र्य भारतात झालेले कायदे

1)जल,जंगल,जमीनीवर येथील वननिवासी/आदिवासी बांधवाचे अधिकार मान्य केले गेले.नुकतेच 6 जुलै,2021. मा.नरेंद्रजी मोदि,सरकारने कायदेशीर शासन निर्णय घेउन जल,जंगल,जमीन वर आदिवासी चा अधिकार हे मान्य केले.तसा कायदा पण तयार झाला.आज सर्वच समाजाला वनहक्क जमीनीचे पट्टे मिडत आहेत
2) भगवान बिरसा मुंडा यांना अपेक्षित भारतीय संविधानात अनुसुची “5” अनुच्छेद “244”या मा.टक्कर बाप्पा यांच्या ड्राफ्ट ला समाविष्ट करण्यात आले
3) भगवान बिरसा मुंडा यांना अपेक्षित भारतीय संविधानात अनुसुची “6”या गोपीनाथ बारडोलाई यांच्या ड्राफ्ट ला समाविष्ट करण्यात आले
4)संविधान सभेतील 299 (ज्यात 80% हिंदू सदस्य होते)या सर्वानी 342 कलम मंजुर करुन आदिवासी ना आरक्षण मिळान्याचा मार्ग मोकळा केला
5)भगवान बिरसा मुंडा यांनी ईसाई धर्मातरीत 6000 आदिवासीना परत आदिवासी करुन घेतल…………………………..मात्र स्वतंत्र्य भारतात 2011 च्या जनगणनेनुसार 10.49करोड जनजाती पैकी 12 लाख मुस्लिम धर्म व 80 लाख ख्रिश्चन धर्मातरीत झाले आहेत
भगवान बिरसा मुंडा यांची पवित्र वचने

देवापुढे पशुचा बडी देउ नका
प्रानिमात्रावर प्रेम करा.गायीची सेवा करा
स्नान केल्या शिवाय जेवन करु नका
शुध्द जिवनासाठी शाकाहार करा
स्वघ्छ कपडे घाला.घर स्वच्छ ठेवा
दारु पिउ नका
घरात तुडशीचे रोप लावून पुजा करा
चोरी करु नका.खोट बोलु नका
कुसंग करु नका एकजुट ठेवा.
ख्रिश्चन मुला मुलीशी लग्न लावु न (डॉ. गोविंद गारे.”स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी क्रांतिकारक”)
भगवान बिरसा मुंडा यांच्या
पुणायतिथी निमित्त विनम्र अभिवादन. सेवा जोहार

प्रकाश गेडाम
प्रदेश सरचिटणीस(संघटन)
भाजपा एस.टि.मोर्चा महाराष्ट्र प्रदेश
डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलीत मित्र.म.रा.
गडचिरोली
मा.सिनेट सदस्य,रा.तु.म.नागपूर विद्यापीठ,नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here