Home गडचिरोली गडचिरोलीत खनिजांचे बेकायदेशीर उत्खनन, शेकाप नेते भाई जयंत पाटील यांची उलगुलान महासभेत...

गडचिरोलीत खनिजांचे बेकायदेशीर उत्खनन, शेकाप नेते भाई जयंत पाटील यांची उलगुलान महासभेत टीका

29
0

आशाताई बच्छाव

IMG_20231210_075741.jpg

गडचिरोलीत खनिजांचे बेकायदेशीर उत्खनन, शेकाप नेते भाई जयंत पाटील यांची उलगुलान महासभेत टीका

गडचिरोली(सुरज गुंडमवार )-: गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींना पेसा, वनहक्क सारख्या कायद्यांच्या माध्यमातून ग्रामसभांना संरक्षण दिले आहे. यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार राज्य शासनाला सुध्दा नाही. परंतु प्रशासन नियमांना डावलून खाणींना परवानगी देत असून येथे सुरू असलेले उत्खनन बेकायदेशीर आहे. असा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. ते प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीतर्फे शहरातील चंद्रपूर रोडवरील अभिनव लाॅन येथे आयोजित उलगुलान महासेभत बोलत होते.

आमदार भाई जयंत पाटील म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्याचे खरे मालक येथील आदिवासी आहे. त्यामुळे त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करणे सरकारची जबाबदारी आहे. परंतु येथे दडपशाही सुरू आहे. पेसा सारख्या कायद्यातून आदिवासींना ग्रामसभांचे विशेष अधिकार प्राप्त झाले आहे. आदिवासींच्या कित्येक पिढ्या येथील वनउपजावर आपली उपजीविका चालवतात. अशा स्थितीत ग्रामसभांचे अधिकार डावलून खासगी कंपन्यांना खनिज उत्खननाची परवानगी प्रशासन कसे काय देऊ शकते. वनकायद्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांचे काम ठप्प पडले आहे. खाणींना मात्र हा कायदा आडवा येत नाही. अशी खोचक टीका पाटील यांनी यावेळी केली.

मोर्चाची परवानगी नकारल्यावरून पाटील यांनी सरकारला खडे बोल सुनावले. ते म्हणाले इंग्रजांच्या काळात आंदोलनाची परवानगी दिल्या जात होती. परंतु आज संविधानाने अधिकार दिल्यानंतरही मोर्चा काढण्याची परवानगी दिल्या जात नाही, हे दुर्दैवी आहे. खाणींना विरोध केल्याने आदिवासींना नक्षलवादी म्हणून तुरुंगात डांबण्यात येतात. ही दडपशाही नव्हे तर काय आहे. यापुढे ही दडपशाही आम्ही लाल बावटा जिवंत असेपर्यंत खपवून घेणार नाही असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.

महासभेला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य काॅ. तुकाराम भस्मे, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष बाळासाहेब खोब्रागडे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हरिषदादा उईके, युवक प्रदेशाध्यक्ष राजेश इरपाते, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे विदर्भ अध्यक्ष विशेष फुटाणे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य महेश कोपूलवार, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, आदिवासी नेते सैनु गोटा, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, भाकपचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोद मडावी, शेकाप महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, शिला गोटा, हंसराज उंदिरवाडे यांच्यासह ग्रामसभा प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

…..चौकट…..
अंगणवाडी सेविकांना शिक्षकांचा दर्जा द्या

मागील कित्येक वर्षांपासून अंगणवाडी सेविका सन्मानजनक वेतनासाठी आंदोलने करीत आहेत. मात्र, शासन त्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. खरे त्यांना शिक्षकांचा दर्जा द्यायला हवा. आम्ही वेळोवेळी त्यांचा आवाज विधिमंडळात पोहोचवला. यापुढेही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करू, असे आ. पाटील यांनी आश्वस्त केले.
……..

Previous articleशेतकरी हितासाठी मार्च एंड पर्यंतचा कांदा निर्यात बंदीचा शासनाने पुनर्विचार करावा–
Next articleमुंबईच्या स्वच्छतेचा ‘खरा हिरो” स्वच्छता कर्मचारी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here