Home Breaking News अखिल भारतीय किसान मजदूर सभा व दिव्यांग वृध्द यांची संयुक्तपणे कार्यकर्त्यांची बैठक...

अखिल भारतीय किसान मजदूर सभा व दिव्यांग वृध्द यांची संयुक्तपणे कार्यकर्त्यांची बैठक देगलूर येथे संपन्न..

111
0

अखिल भारतीय किसान मजदूर सभा व दिव्यांग वृध्द यांची संयुक्तपणे कार्यकर्त्यांची बैठक देगलूर येथे संपन्न..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलुर:- भूमिहीन दिव्यांग,शेतमजूर, गायराणपट्टे धारक शेतमजूर यांच्या जमीन हक्काच्या लढाईसाठी दि ११मार्च २१ रोजी काँ. अशोक घायाळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाच्या कार्यकर्त्यांची बैठकित प्रमुख उपस्थिती दिव्यांग वृध्द निराधार मार मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल व रंगनाथ भालेराव यांची उपस्थितीत संपन्न झाली.
प्रस्ताविक रंगनाथ भालेराव सरांनी आजच्या मिटिंग जमीन हक्क मिळावा म्हणून नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयावर कोव्हिड संकटकाळी नियमाचे पालन करून एका दिवसाचे धरणे आंदोलन करून शासन प्रशासन यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी बैठक आयोजित केले
प्रमुख मा संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिव्यांगाना कोणीही आधार देत नसल्यामुळे शासनाने जंगल जमीन, गायरान जमीन, मसुुरा जमीन, परमपुक जमीन, सिलिंग जमिन भूमिहीन दिव्यांग, शेतमजूर, गायराण पट्टेधारक बांधवांच्या नावावर दिले तर त्या दिव्यांगाना मान सन्मान व सर्व सामान्य जनतेसाठी त्यांना सन्मानाने त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांना जगवतील व शासनास महसुल जमा होऊन शासनाच्या तिजोरीत वाढ होईल म्हणून अखिल भारतीय किसान मजदूर सभा व आदिवासी हक्क संघर्ष समिती, दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र यांच्या संयुक्त कृति समितीने आयोजित केलेल्या २३ मार्च २१
रोजी एका दिवसाच्या धरणे आंदोलन कोव्हिड संकटकाळी शासनाच्या नियमाचे तंतोतंत पालन करून मोजक्याच कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन शासन प्रशासन यांचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोप अखिल भारतीय किसान मजदूर सभेचे केंद्रीय सचिव अशोक घायाळे यांनी दि २३ मार्च १९३१ या दिवशी भगतशिग यांना फासावर लटकवले त्याच दिवशी गोरगरिबांना या सुलतान शाही सरकारने अनेक दिवसांपासून गायरान पट्टे मिळावे म्हणून शासन प्रशासन खडबडून जागे करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या भूमिहीन यांना न्याय देण्याऐवजी त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न सध्या या सरकारने चालु केला आहे तर दुसरीकडे कारखानदार करणार्‍या भांडवलशाही साम्राज्य वादी यांना हजारो एकर जमीन देत आहे हि विषमता शासन प्रशासन यांना दाखविण्यासाठी आपल्या एकीची गरज आहे,
म्हणून दि २३ मार्च २१ रोजी कोव्हिड संकटकाळी शासनाने घालुन दिलेल्या नियमाचे पालन करून धरणे आंदोलन सर्व तहसिल कार्यालय येथे सहभागी व्हावे असे आवाहन घायाळ यांनी केले.
या बैठकीत रामकिसन कांबळे, सोपान नरहरे, शिवाजी चव्हाण सर, बळीराम, गऊलवार राजु, कांबळे, जयसिंगराव, बालाजी होनपारखे, आदीनाथ, भानुदास, अहमसाब, मारोती वाघमारे दताञय सोनकांबळे, शेख ऊंद्रीकर, ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते असे प्रसिध्दी पञक देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here