Home Breaking News बेटमोगरा येथील जि प हा शाळेचे मुख्याध्यापक बहिरवाड यांचा महापराक्रम,शालेय पोषण आहार...

बेटमोगरा येथील जि प हा शाळेचे मुख्याध्यापक बहिरवाड यांचा महापराक्रम,शालेय पोषण आहार व गणवेश वाटपात मोठा भ्रष्टाचार , तर शाळा देखभाल दुरुस्तीसाठी आलेल्या अनुदानाची व शाळेच्या बँक खात्यांची चौकशी करा – भारत सोनकांबळे यांची शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

169
0

बेटमोगरा येथील जि प हा शाळेचे मुख्याध्यापक बहिरवाड यांचा महापराक्रम,शालेय पोषण आहार व गणवेश वाटपात मोठा भ्रष्टाचार , तर शाळा देखभाल दुरुस्तीसाठी आलेल्या अनुदानाची व शाळेच्या बँक खात्यांची चौकशी करा – भारत सोनकांबळे यांची शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

तर सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना यादीमध्ये आपल्या शाळेतील मुलींची नांवे समावीष्ठ न करता शाळेबाह्य मुलींचे नांवे नोंदवले

मुखेड ता.प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेची अत्यंत दयनीय अवस्था झालेली पाहावयास मिळते. या शाळेचे मुख्याध्यापक भैरवाड यांनी शालेय पोषण आहार व गणवेश वाटप तसेच शालेय विकास कामासाठी आलेल्या विविध निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे एकेकाळी बेटमोगरा येथील जिल्हा परिषद शाळा हे नांदेड जिल्ह्यामध्ये दहावी बोर्ड परीक्षा सह विविध क्षेत्रात अव्वल नंबर ची शाळा म्हणून पहावयास मिळत होती आज सद्यस्थितीत या जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळते कारण या शाळेचे मुख्याध्यापक भैरवाड यांनी शालेय पोषण आहार गणवेश वाटप डिजिटल शाळा करण्याचे कामे व ओबीसी व्हि.जे.एन.टी.मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेमध्ये आपल्या जि.प.हा. शाळा बेटमोगरा मधील पाचवी सहावी सातवी च्या मुलींची नावे यादीमध्ये समावेश न करता शाळेबाहेरील त्यांचे शाळेमध्ये नाव नसताना शाळाबाह्य अपरिचित ओबीसी ,
व्हि.जे.एन.टी मुलींचे नावे समाविष्ट केले आहे.बेटमोगरा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मुखेड तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे बेटमोगरेकर यांनी दि.१० मार्च रोजी भाजपा ता. सचिव मष्णाजी पाटील यांच्या समवेत खालील मागणीचे संदर्भात मा शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे निवेदन दिले.
१) सन २०१२ ते आज पर्यंतच्या शाळा अनुदान काना शिक्षक अनुदान देखभाल दुरुस्तीसाठी प्रत्येक वर्षी आलेल्या अनुदानाची चौकशी करण्यात यावी व शासनाकडून आलेल्या निधीचा चिकट बुक वरील बोगस पावत्यांची चौकशी करण्यात यावी.२) शाळेच्या नावे असलेल्या सर्व बँक खात्यांची चौकशी करण्यात यावी सन 2012 ते आज पर्यंत च्या कार्यकाळात ग्रामपंचायत अंतर्गत तेरावा चौदावा पंधरावा वित्त आयोगाच्या माध्यमातून शाळेसाठी कोणकोणत्या कामासाठी किती निधी देण्यात आला आणि त्याचा विनियोग अशा पद्धतीने करण्यात आले त्याची चौकशी करावी. ३) सन 2019 मध्ये शाळेतील सात संगणक संच हे चोरी गेल्याची खोटी तक्रार पोलीस स्टेशनला देऊन तो संगणक चोरीचा विषय सदर मुख्याध्यापकांनी चार ते सहा महिन्यातच विषय बंद का करण्यात आला तरी यात मुख्याध्यापकांनी व काही शिक्षकांच्या संगनमताने सदर शाळेतील संगणक संच लंपास केले असावेत असा संशय असून त्याची चौकशी करण्यात यावी.४) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मध्ये इयत्ता पाचवी सहावी सातवी च्या मुलींना शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते या योजनेच्या यादीत शाळाबाह्य व अपरिचित मुलींची नावे नोंद घेण्यात आले आहेत याची चौकशी करण्यात यावी ५) सर्विस बुक,दीर्घ रजा बुक व शिक्षक हजेरी बुक यामध्ये मोठी तफावत असून त्याची चौकशी करण्यात यावी.६) सदर मुख्याध्यापकाने शाळेतील अंदाजे दोन टेम्पो रद्दी विक्री केली असून त्याची चौकशी करावी या मुख्याध्यापकाने शिक्षक हजेरी बुक वर ओव्हर राईटिंग केलेले असून ( पं.स.मुखेड,जि.प.नांदेड) असे आपल्या मर्जीतील शिक्षकांच्या नावापुढे लिहिण्यात आले असून याची चौकशी करावी. ७)शिक्षकांच्या व मुख्याध्यापकाच्या घेतलेल्या अर्जित रजा व सेवा पुस्तिका यांची चौकशी करण्यात यावी ८) कोरोना काळात शाळेसाठी आलेला निधी किती व कुठे गेला कोणते साहित्य खरेदी केले ना मास्क ना सॅनीटायजर चौकशी करावी, ९) सदर मुख्याध्यापक भैरवाड व शिक्षक चव्हाण पदवीधर विषय शिक्षक असताना बदलीचा ऑनलाइन फॉर्म भरत नाहीत याची चौकशी करा. १०) या शाळेतील शौचालयाचे दारे बंद असून त्यामध्ये व सभोवताली घान साचलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना मुलींना लघवीसाठी साठी शौचास जाण्यास शाळेत कुठलीच सोय नाही. काही शिक्षक व शिक्षिका शाळेला कधी येतात आणि कधी निघून जातात याचा काही नेम नाही शालेय व्यवस्थापन समितीची नेमणूक का घेण्यात आली नाही.मासिक बैठकीत शिक्षकांना धमकावतात व माझ्या दोषी चुका सांगाल तर तुमचे वाटोळं करील असे म्हणत सर्व शिक्षकांना तुमच्या सर्वांच्या खोट्या माझ्या हातात आहेत असे म्हणतात याची चौकशी करावी.
मुख्याध्यापक वा डी भैरवाड यांची दैनंदिन दिरंगाई व दररोज कधी या कारणामुळे तर कधी त्या कारणामुळे अशा विविध बहाण्याने स्वतः गैर हजर राहतात त्यामुळे सद्यस्थितीत शिक्षक व विद्यार्थी यांच्यावर कसल्याच प्रकारचे नियंत्रण राहिलेले नाही कोणता शिक्षक कधी येतो आणि कधी निघून जातो याचा काही नेम राहिलेला नाही काही शिक्षक व शिक्षिका शाळा सुटायच्या अगोदर निघून जातात .शाळेतील शिक्षकांची हजेरी पट व त्यांनी घेतलेल्या दीर्घ रजे मध्ये मोठी तफावत आणि ताळमेळ लागत नाही.सदर मुख्याध्यापक वाय.डी.बहिरवाड हे क्रीडा शिक्षक आहेत त्यांनी कोणतेही ग्राउंड आखले नाहीत आणि ग्राउंड आखून विद्यार्थ्यांना विविध प्रकारची खेळे खेळविलेली नाहीत संबंधित मुख्याध्यापक क्रीडा शिक्षक असून त्या शिक्षका ची गणना नवीन शासन निर्णयानुसार विषय शिक्षकांमध्ये करण्यात आली आहे असे समजते त्यामुळे ते मुख्याध्यापक पदावर राहू शकतात का असा प्रश्न पडतो मुख्याध्यापक भैरवाड हे शाळेचे प्रत्येक प्रशासकीय काम करण्याऐवजी जिल्हा परिषद कडून मार्गदर्शन घेण्याच्या नावाखाली दिवसेंदिवस शाळेतून गायब आहेत त्यामुळे प्रशालेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here