Home भंडारा मैत्रेय भीम बुद्ध जयंती समितीतर्फे भोजापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त...

मैत्रेय भीम बुद्ध जयंती समितीतर्फे भोजापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

36
0

आशाताई बच्छाव

1000271565.jpg

मैत्रेय भीम बुद्ध जयंती समितीतर्फे भोजापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) मैत्रय भीम बुद्ध जयंती समारोह समिती अपूर्वा कालोनी शेषनगर टेलिफोन कालोनी भोजापूर भंडारा येथे विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त अपूर्वा कालोनी भोजापूर येथे भीम जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे .दिनांक 13 एप्रिल 2024 ला सायंकाळी ७ वाजता भिम बुद्ध गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सुप्रसिद्ध प्रबोधनकार संविधान भारती यांचा संगीतमय भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम मिलिंद जनबंधू यांच्या घरासमोर नॅशनल हायवे रोड भोजापूर. करण्यात आलेला आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विष्णुजी मडावी सामाजिक कार्यकर्ते भोजापूर राहतील .तर प्रमुख वक्ते म्हणून नितीन कारेमोरे सुप्रसिद्ध शिवचरित्र व्याख्याता व आंबेडकरी विचारवंत हे राहतील. रात्री १३ एप्रिलला सुप्रसिद्ध प्रबोधनकार संविधान भारती यांचा संगीतमय भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम मिलिंद जनबंधू यांच्या घरासमोर नॅशनल हायवे नंबर ते भोजापूर रोड सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. दिनांक 14 एप्रिल 2024 ला सकाळी 10 वाजता बुद्ध वंदना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात येईल. सकाळी 11 वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रीतीताई मानापुरे पोलीस पाटील भोजापूर राहतील .कार्यक्रमाचे उद्घाटक स्नेहा साखरवाडे सामाजिक कार्यकर्त्या राहतील .प्रमुख अतिथी म्हणून मनीषा भांडारकर सामाजिक कार्यकर्त्या, संजीव भांबोरे राज्य सरचिटणीस प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य ,सदानंद धारगावे अध्यक्ष विदर्भवादी शेतकरी संघटना व व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना हे उपस्थित राहतील .कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आवाहन किरण मेश्राम ,निलेश खोब्रागडे , बिसन बारसागडे ,अलका मेश्राम ,मनीषा खोब्रागडे ,राहुल बोरकर ,प्रमोद वानखेडे, उद्धव बडोले ,अविनाश कोटांगले ,कमोज वानखेडे ,सुधीर वैद्य, मिलिंद जनबंधू मनीषा भांडारकर रंजू जनबंधू वंदना बारसागडे प्रज्ञा घोरपडेयांनी केलेले आहे.

Previous articleवंडगीर येथील हरीनाम सप्ताहाचे महा प्रसादाने सांगता
Next articleभाजपमध्ये अशोक पांगारकर यांना डावलले जात असल्याची सकल तेली समाजाची भावना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here