Home भंडारा गॅलेलियो यांच्या शोधामुळे विज्ञानाची प्रगती- विष्णुदास लोणारे

गॅलेलियो यांच्या शोधामुळे विज्ञानाची प्रगती- विष्णुदास लोणारे

26
0

आशाताई बच्छाव

IMG_20240227_203331.jpg

गॅलेलियो यांच्या शोधामुळे विज्ञानाची प्रगती- विष्णुदास लोणारे

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )शहरातील जकातदर कन्या जिल्हा परिषद शाळा येथे मराठी दिनाच्या निमित्त व जागतिक विज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येला शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाऱ्याच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी विभाग राज्य सहकार्य वाह विष्णुदास लोणारे, जिल्हा प्रधान सचिव प्राध्यापक युवराज खोब्रागडे शाखा कार्याध्यक्ष नितेश बोरकर ,तसेच शाळेचे मुख्याध्यापक डी.आर .हटवार ,सौ .एम .एम. जाधव ,कु.एस.बी. मते ,कु. एस. बी .घासले ,श्री .आर .आर.लांडगे उपस्थित होते यावेळी विष्णुदास लोणारे यांनी सांगितले जगात सर्व प्रथम गॅलिलिओ यांनी 1564 ते 1642 या काळात दुर्बिणीचा शोध लावला आणि विज्ञानाची क्रांती झाली. माणूस जमिनीवरून आकाशात जाऊ लागला.हे गॅलिलिओ याच्या वैज्ञानिक शोधामुळे विज्ञानाची प्रगती झाली. तरीसुद्धा माणूस अंधश्रेद्धाला खत पाणी घालण्याचे काम करीत आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. असे मत व्यक्त केले अंधश्रद्धा आणि विज्ञान यातील फरक काय ते विविध प्रयोगाद्वारे प्रात्यक्षिके करून दाखविले त्यामागे असलेले वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांना समजावून सांगितले तसेच प्राध्यापक युवराज खोब्रागडे यांनी जादूटोणाविरोधी कायदा व समाजात असलेली अंधश्रद्धा याविषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleवंचित चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांची 4 मार्चला साकोली येथे जाहीर सभा
Next articleबेलोरा विमानतळावरून नाईट लँडिंग व मराठी भाषा विद्यापीठासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here