Home भंडारा वंचित चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांची 4 मार्चला साकोली येथे...

वंचित चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांची 4 मार्चला साकोली येथे जाहीर सभा

108

आशाताई बच्छाव

IMG_20240227_202608.jpg

वंचित चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांची 4 मार्चला साकोली येथे जाहीर सभा

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) वंचित चे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या 4 मार्चला भंडारा जिल्हा दौरा असुन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची सभा साकोली येथील पटाची दान एकोडी रोड येथे 4 मार्च 2024 ला ठीक 2.00 वाजता आदिवासी बहुजन अधिकार महासभा आयोजित करण्यात आली असून या सभेला ऍड बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत .
जल ,जंगल जमिनीचे संरक्षण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी समाजाला त्यांच्या संविधानिक हक्क व अधिकारापासून वंचित ठेवण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. आदिवासी समाजाचे हक्क व अधिकार जरी भारतीय संविधानात सुरक्षित असले तरी त्याची अंमलबजावणी शासन करताना दिसत नाही. आदिवासी समाजाच्या अधिकाऱ्यांना बळ देण्यासाठी व वन हक्क कायदा 2006 पारित करण्यात आला पण त्याची अंमलबजावणी व जनजागृती होत नाही .त्यातच आदिवासी समाजाचा हक्क वगळून जल जंगल जमीन मोठ मोठ्या उद्योगपतींच्या ताब्यात देण्याचे हे सरकार करीत आहे .शैक्षणिक अधिकारापासून आदिवासी समाज काही प्रमाणात प्रगतीपथावर आहे. जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, आरक्षण असे विविध कारणे पुढे करीत या समाजात उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे कट कारस्थान हे सरकार करीत आहे. आदिवासी ,ओबीसी समाजाच्या अधिकाऱ्यांना बळ देण्यासाठी आदिवासी बहुजन अधिकार महासभा होणार असून जास्तीत जास्त संख्येने एस सी, एसटी ,ओबीसी व मायनॉरिटी या जनतेने सभेचा लाभ घ्यावा असे आव्हान भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे.

Previous articleछत्रपती शिवराय हे उत्तम प्रशासक व आदर्श लोकराजे – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
Next articleगॅलेलियो यांच्या शोधामुळे विज्ञानाची प्रगती- विष्णुदास लोणारे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.