Home उतर महाराष्ट्र नेवाशात ‘भाजप’ला फुटीचे ग्रहण

नेवाशात ‘भाजप’ला फुटीचे ग्रहण

130
0

आशाताई बच्छाव

IMG_20240208_172312.jpg

नेवाशात ‘भाजप’ला फुटीचे ग्रहण

मुरकुटे गट हतबल; आमदार गडाख गटात उत्साह

 

सोनई, ता. ७, कारभारी गव्हाणे: राज्यासह देशात भारतीय जनता पक्षात सामील होण्याचा फ्लो वाढता असला, तरी नेवासे तालुक्यात मात्र ‘भाजप’चे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी वाढली आहे. त्यामुळे कार्यकत्यांचा ओघ आमदार शंकरराव गडाख गटात दाखल होत आहे. दोन वर्षांपूर्वी झालेली प्रवेशाची लाट लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा सुरू झाल्याचे चित्र आहे.
मागील आठवडयात जेऊर हैबती (ता. नेवासे) येथील ‘भाजप’चे भटक्या विमुक्त आघाडीचे उपाध्यक्ष बाळासाहेब फुलमाळी अनेक सदस्य व समाज बांधवांसह आमदार गडाख गटात सामील झाले. यानंतर लगेचच गेवराई सेवा संस्थेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी गुंजाळ, विष्णू कुसळकर,गणेश धनवटे, अविनाश बर्वे आदी पंधरा कार्यकत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन गडाख गटात सह‌भागी झाले. दोन दिवसांपूर्वी जळके खुर्द येथील माजी आमदार मुरकुटे यांचे कट्टर समर्थक शरद पागिरे यांनी साथ सोडली.गडाख गटात प्रवेश केलेल्या सर्वांनी माजी आमदार मुरकुटे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत विकासात्मक कामाला अग्रक्रम म्हणून गडाख गटात प्रवेश करीत असल्याचे सांगितले, सन २०२२ मध्ये नेवासे नगरपंचायतमधील भाजपचे गटनेते सचिन नागपुरेसह तीन नगरसेवकांनी गडाख गटात प्रवेश केलेला आहे. मुरकुटे कुटुंबातील पंचायत समिती सदस्य, तसेच राहत्या गावातील ग्रामपंचायत सदस्याने प्रवेश केलेला आहे. देवगाव सेवा संस्थेवर गडाख प्रणित भगवा झेंडा फडकला यामध्येच गावाला खिंडार पडल्याचे दिसते.

भाजप व मुरकुटे गटाला स्व. उत्तमराव पागिरे यांनी व त्यानंतर आम्ही साथ दिली. मात्र, गाव व परिसरातील शेती, जलसंधारण व विकासात्मक कामाला चालना भेटत नव्हती कामाचा माणूस म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमदार गडाख गटात आता प्रवेश केला आहे

Previous articleतुमसर तालुका न्यायालयातील वकिलांचे ‘पेन डाऊन’ आंदोलन…
Next articleपाच दिवसांचा ‘महासंस्कृती महोत्सव’;महोत्सवाच्या यशस्वितेसाठी सुक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here