Home अमरावती पाच दिवसांचा ‘महासंस्कृती महोत्सव’;महोत्सवाच्या यशस्वितेसाठी सुक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

पाच दिवसांचा ‘महासंस्कृती महोत्सव’;महोत्सवाच्या यशस्वितेसाठी सुक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

20
0

आशाताई बच्छाव

IMG_20240208_172638.jpg

पाच दिवसांचा ‘महासंस्कृती महोत्सव’;महोत्सवाच्या यशस्वितेसाठी सुक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

गजानन जिरापुरे
जिल्हा प्रतिनिधी अमरावती

अमरावती,  : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रांतातील संस्कृतीचे आदानप्रदान, संवर्धन, स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यत पोहचविण्याच्या उद्देशाने अमरावती येथे पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी परिपूर्ण आराखडा व सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले.

 

जिल्हास्तरावर घेण्यात येणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाच्या आयोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, महापालिकाचे उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहायक आयुक्त भुषण पुसदकर, सहायक माहिती अधिकारी सतिश बगमारे तसेच अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्रातील विविध प्रदेशांतील संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम तसेच जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावा यासाठी त्यांच्या कलागुणानुसार विविध कार्यक्रम आयोजन करण्यात येईल. सोबतच शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, भारूड, गोंधळ, पोवाडा, खडी गंमत, कोळीगीत, लोककलेतील विविध प्रकार, स्थानिक कला प्रकार, नाटक, कवी संमेलन, व्याखानमाला अशा कार्यक्रमांची रेलचेल असेल. या महोत्सवामध्ये शासनाच्या विविध विभागाचे व महिला बचत गटांचे स्टॉलही येथे उपलब्ध असतील.

 

महासंस्कृती महोत्सव दि. 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान घेण्याचे नियोजन आहे. महोत्सवाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांबाबत स्वतंत्रपणे उपसमित्या तयार कराव्यात. त्याद्वारे प्रत्येक कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करून परिपूर्ण आराखडा निश्चित करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.

Previous articleनेवाशात ‘भाजप’ला फुटीचे ग्रहण
Next articleशासकीय खरेदी ४ दिवसात थांबली; फक्त ३३४९ क्विंटल सोयाबीन खरेदी अमरावती जिल्ह्यात अजूनही ४ लाख क्विंटल विक्री विना शेतकऱ्याकडेच आहे.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here