Home अमरावती शासकीय खरेदी ४ दिवसात थांबली; फक्त ३३४९ क्विंटल सोयाबीन खरेदी अमरावती जिल्ह्यात...

शासकीय खरेदी ४ दिवसात थांबली; फक्त ३३४९ क्विंटल सोयाबीन खरेदी अमरावती जिल्ह्यात अजूनही ४ लाख क्विंटल विक्री विना शेतकऱ्याकडेच आहे.

27
0

आशाताई बच्छाव

IMG_20240208_172959.jpg

शासकीय खरेदी ४ दिवसात थांबली; फक्त ३३४९ क्विंटल सोयाबीन खरेदी अमरावती जिल्ह्यात अजूनही ४ लाख क्विंटल विक्री विना शेतकऱ्याकडेच आहे.
———–
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
यावर्षी फेब्रुवारी महिना सुरू होताच सोयाबीनच्या दरात प्रचंड घट झाली. हजारावर दर अपेक्षित असताना सोयाबीनचा दर ४हजार३०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत गडगडले, दुसरीकडे जिल्ह्याची सरासरी उत्पादक तसेच मागील वर्षातील आवक लक्षात घेता अजूनही सुमारे चार ते साडेचार लाख प्रिंटर सोयाबीन विक्री विनाश क्षेत्रात शेतकऱ्याकडेच आहे. अशातच हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. मात्र केवळ देखावा म्हणून जिल्ह्यात अवघ्या चार ते पाच दिवसात सरकारी खरेदी उरकण्यात आली. जिल्ह्यात उघडलेल्यातीन केंद्रावर४ते५ दिवसात केवळ ३हजार३४९ सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे. या प्रकरणाने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. विक्री झालेल्या सोयाबीन किंटल येथील भाव२०२०-२१ मधे१४ लाख ६९ हजार ६८८.-६०००.तसेच२०२१ते २२–११ लाख.-६६०५
२०२२ते२०२३.१३ लाख ८८ हजार २९२.–४३००.
सोयाबीन विक्री शेतकऱ्याकडून केल्या जाते. यंदा मात्र सोयाबीनचे दर मागील काही वर्षांच्या तुलनेत कमी असल्यामुळे ८लाख९४ हजार क्विंटल झाली. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या दरात चकाकी येते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे, मात्र यावर्षी भावात प्रचंड घसरण झाली आहे. आम्ही शेतकऱ्याचे कैवारी असा पुडका आणणाऱ्या शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी अख्या जिल्ह्यात तिवसा, नांदगाव खंडेश्वर आणि दर्यापूर या तीन ठिकाणी खतर मात्र केंद्र सुरू केले. यात तिवसा येथे पाच दिवस तर नांदगाव व दर्यापूर चार दिवस केंद्र सुरू ठेवले. या तिन्ही केंद्रावर ७७५ शेतकऱ्यांनी नोंद केली होती, त्यापैकी २३८ शेतकऱ्यांचे केवळ सव्वा तीन हजार क्विंटल सोयाबीन आता खरेदी केली आहे. उर्वरित ५३७ शेतकऱ्यांची सोयाबीन सुद्धा अद्याप घेतलेले नाही. आणि ६ फेब्रुवारीपासून खरेदी केंद्र बंद करण्यात आले फेब्रुवारीला सायंकाळपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवण्याबाबत आदेश आले नव्हते. त्यामुळे सोयाबीनची शासकीय खरेदी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here