Home मुंबई ग्राहक सेवा संस्था (रजि)CONSUMER AWARENESS COMMITTE (REGD) मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेला सरकार कडून...

ग्राहक सेवा संस्था (रजि)CONSUMER AWARENESS COMMITTE (REGD) मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेला सरकार कडून मिळणारे हक्काचे रेशन पुर्ण मिळण्यासाठी उचले पाऊल

40
0

आशाताई बच्छाव

IMG_20240208_173317.jpg

ग्राहक सेवा संस्था (रजि)CONSUMER AWARENESS COMMITTE (REGD) मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेला सरकार कडून मिळणारे हक्काचे रेशन पुर्ण मिळण्यासाठी उचले पाऊल
सविता तावरे-मुंबई स्पेशल रीपोर्टर
ग्राहक सेवा संस्था (रजि) संस्थापक अध्यक्ष श्री गितेंद्र मिर्लेकरसर यांच्या निर्देशानुसार,
काल बुधवार, दि. ०७ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ठीक १.०० वाजता घाटकोपर पंतनगर येथील शिधावाटप कार्यालयात शिधावाटप अधिकारी श्री चैतन्य वानखेडे साहेब तसेच शिधावाटप अधिकारी (तपासणी) श्री तडवी साहेब यांची ग्राहक सेवा संस्थेच्या (रजि) मुंबई पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. तेव्हा
ग्राहक सेवा संस्था (reg) मुंबईचे अध्यक्ष समीर नाईक, मुंबई उपाध्यक्ष मालतेशसर हेब्बारे , मुंबई महिला अध्यक्षा सविता ताई तावरे, मुंबई महिला उपाध्यक्षा सविता ताई चाकणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी शिधा वाटप अधिकारी श्री चैतन्य वानखडे साहेब व शिधावाटप अधिकारी (तपासणी) तडवी साहेब यांची भेट घेऊन शिधा वितरण, वितरणातील त्रुटी, ग्राहकांच्या समस्या, रेशनिंग दुकानदार यांची मनमानी यांवर सकारात्मक चर्चा केली. वानखेडे साहेबांनी चांगल्या प्रकारे माहिती देऊन त्यांना पुर्ण सहकार्य केले. जो पर्यंत जनतेला हक्काचे पुर्ण रेशनिंग मिळणार नाही तोपर्यंत ग्राहक सेवा संस्थेचे पदाधिकारी कारवाई करतच राहणार. जे गरीब जनतेच्या हक्काचे रेशनिंग आहे ते जनतेला मिळालेच पाहिजे अशी इच्छा वानखेडे साहेबांन कडे व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here