Home भंडारा कामगारांना प्रत्येक तालुक्यात किटचे वाटप करा- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

कामगारांना प्रत्येक तालुक्यात किटचे वाटप करा- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

36
0

आशाताई बच्छाव

IMG_20240208_173642.jpg

कामगारांना प्रत्येक तालुक्यात किटचे वाटप करा- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

अन्यथा रस्त्यावर उतरू

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )भंडारा शहरा लगत बेला या ठिकाणी एका मंगल कार्यालयात किट व पेटीचे वाटप केले जात आहे त्यात मोठ्या प्रमाणात अनीयमीतता दिसून येत आहे.किट मिळविण्यासाठी माता भगिनींना त्रास सहन करावा लागत आहे शासनाने ज्या कंपनिला किट वाटप करण्याचा कत्रांट दिला त्या कंपनीने तालुका निहाय किट वाटप केन्द्र न उघडता जिल्हयाचा एकच केन्द्र उभारला असल्याने १००कि.मि.अंतरावून येणारया सर्व सामान्य नागरीकांना किट प्राप्त करण्यास अतीसय त्रास होत आहे किट न मिळत असल्यान रात्री बेरात्री परत जावे लागतो त्याकरीता शासनाने व प्रशासनाने तालुका निहाय किट वाटप केन्द्र उभारुन सामान्य नागरीकांना,त्रास होणार नाही याची तात्काळ काळजी घ्यावी अन्यथा शासन आणि प्रशासनाच्या विरोधात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)भंडारा जिल्हयाच्या वतीने रस्त्यावर उतरुन जनतेच्या हितासाठी तिव्र आंदोलन केला जाईल.
किट मिळेल याआशेनी १०० कि.मि.दुर अंतरावरून माता भगीनी आपल्या लहान बाळांना घरी सोडून मिळेल त्या साधनांने भंडारा येथे यावे लागते सकाळपासून रात्री पर्यंत किट मिळेल या अपेक्षेने तात्कळत उभे राहतात. किटवाटप केन्द्रांच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, कार्यालयाच्या परीसरात लाईट चि व्यवस्था नाही, अंधारात मिळेल त्या,ठिकाणी बसूनराहतात.काही महीला किट घेण्यासाठी गेट जवळ उभे असतांनी त्या महीलांना दांडा फेकुन मारल्या जातो ,तेथिल महीलांची ओरड आहे कि या ठिकाणी एजंट नेमले आहेत ते एजंट प्रती किट साठी ५०० रुपयाची मागणी करतात ज्यांनी पैसे दिले त्यांना त़्वरीत किट दीली जातो अशा प्रकारचा भोगंळ कारभार चालू असतांनी सत्ताधारी खासदार आणि आमदार बघ्याची भुमीका घेत आहेत मात्र गोर-गरीबांची किट प्राप्त करुन घेण्यासाठी जि धावपळ होत आहे,जो त्रास होत आहे या कडे अजीबात लक्ष नाही
शासन आणि प्रशासनाने त्वरीत दखल घेउन त्या माता भगीनींना किट मिळविण्यासाठी त्रास होणार नाही याची काळजी घेउन प्रत्येक तालुक्यात किट वाटप केन्द्र सुरु करावे येत्या दोन दिवसात केन्द्र उघडले नाही आणि अशीच परीस्थिती उदभवत असेल तर गोर गरीबांच्या हितासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे).भंडारा जिल्हयाच्या वतीने तिव्र आंदोलन करु असा इशारा जिल्हाधीकारी यांना निवेदना मार्फत देण्यात आला .
निवेदन देतानी जिल्हा सह सपंर्क प्रमुख नरेश डाहारे,उप जिल्हा प्रमुख दिपक गजभीये,तालुका प्रमुख देवेन्द्र कारेमोरे,विभाग प्रमुख गजानन कळंबे,रामलाल बावणकर,चिराग चेटुले, गुरुदेव लिचडे,गुरुदेवसाकोरे,राधेश्याम बांगढकर,केवल फंदे,नत्थु बांन्ते,संजय मडावी,अनिल वरकडे,खुशाल कावळै,अरविंद पडोळे,सुयोग धाबेकर,रुपा चाचेरे,वृत्तीक श्रीसागर,अनुप भोयर व अन्य शिवसैनीक उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here