• Home
  • डोंबिवलीकरांना कामावर जाण्यासाठी लावाव्या लागल्या भल्या मोठ्या रांगा !

डोंबिवलीकरांना कामावर जाण्यासाठी लावाव्या लागल्या भल्या मोठ्या रांगा !

🛑 डोंबिवलीकरांना कामावर जाण्यासाठी लावाव्या लागल्या भल्या मोठ्या रांगा ! 🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

डोंबिवली :⭕ कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आजपासून कार्यालये, मंदिरांसह अन्य व्यवसाय सुरु करण्याची मुभा दिली आहे. यामुळे जीव धोक्यात घालून डोंबिवलीतील नोकरदार वर्ग कार्यालयात जाण्यासाठी तयार झाला आहे. मात्र, पहिल्याच दिवशी नियोजनाचा फज्जा उडालेला दिसून आला.
डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यामुळे जवळपास दोन किमी पर्यंत रांग लागल्याचे दिसून आले. सोमवारपासून मुंबई हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.
मात्र, बसचे नियोजन नसल्याने या नोकरदारांच्या त्रासात भर पडली आहे.
राज्य शासनाच्या नियोजनाचा फज्जा उडाला असून बस येणार असे सांगूनही आलेल्या नाहीत, नागरिक त्रस्त झाले असून कामावर जायचे तरी कसे? आणि पुन्हा यायचे कसे? असा सवाल महिलांनी केला असून दिवस कसे काढायचे, सोशल डिस्टन्सच्या नियमांचे काय होणार असाही प्रश्न उपस्थित केला आहे.
डोंबिवली येथून सायन, मुंबई, अंधेरी, दादर, घाटकोपर, तसेच मानखुर्द, मंत्रालय आदी भागात जाण्यासाठी सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांनीही गर्दी केली होती.⭕

anews Banner

Leave A Comment