Home कोरोना ब्रेकिंग वाशिम जिल्ह्यात परतणार्‍यानी वाढविली चिंता !

वाशिम जिल्ह्यात परतणार्‍यानी वाढविली चिंता !

127
0

🛑 वाशिम जिल्ह्यात परतणार्‍यानी वाढविली चिंता ! 🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

वाशिम :⭕ परजिल्ह्यातून बोराळा हिस्से (ता.वाशिम), भोयणी (ता.मानोरा) व दादगाव (ता.कारंजा) येथे आलेली प्रत्येकी एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. अर्थात परजिल्ह्यातून येणाऱ्यांमुळेच जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. दरम्यान, या तिन्ही गावांतील १६०० जणांची तपासणी रविवारपर्यंत करण्यात आली. त्यातच बोराळा हिस्से येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कात तब्बल ५१ जण असून यामध्ये वाशिम येथील एका खासगी रुग्णालयातील चार डॉक्टर व चार कर्मचारी आल्याने शहरातील खासगी डॉक्टरांत भीतीचे वातावरण निर्माण झाले.
वाशिम तालुक्यातील बोराळा हिस्से येथील २५ वर्षीय युवक हा कोरोनाबाधित असल्याचे ६ जूनला सायंकाळी स्पष्ट झाले. हा युवक यापूर्वी अमरावती येथून एकदा जाऊन आल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. या युवकाच्या संपर्कात वाशिम येथील एका खासगी दवाखान्यात चार डॉक्टर व चार कर्मचाºयांसह कुटुुंबातील २० आणि गाव परिसरात २३ जण आल्याची माहिती आहे. या सर्वांना ‘क्वारंटीन’ केले असून, ७ जून रोजी जवळपास २० जणांचे थ्रोट स्वॅब नमुने घेतले.
मानोरा तालुक्यातील भोयणी, कारंजा तालुक्यातील दादगाव आणि वाशिम तालुक्यातील बोराळा हिस्से ही तिनही गावे सील केली असून, आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण व तपासणी सुरू आहे. बोराळा हिस्से येथील रुग्णाच्या संपर्कात जवळपास ५१ जण आले असून, त्यांचे थ्रोट स्वॅब नमुने घेतले जात आहेत. दादगाव येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
– डॉ.अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम ⭕

Previous articleनवी मुंबई महापालिकेत ५९० पदांसाठी भरती
Next articleडोंबिवलीकरांना कामावर जाण्यासाठी लावाव्या लागल्या भल्या मोठ्या रांगा !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here