Home भंडारा तुमसर तालुका न्यायालयातील वकिलांचे ‘पेन डाऊन’ आंदोलन…

तुमसर तालुका न्यायालयातील वकिलांचे ‘पेन डाऊन’ आंदोलन…

78
0

आशाताई बच्छाव

IMG_20240208_171858.jpg

तुमसर तालुका न्यायालयातील वकिलांचे ‘पेन डाऊन’ आंदोलन…

न्यायालयीन प्रक्रिया प्रभावित

प्रकरण खाजगी वकिलाला दिलेल्या शिक्षेचे

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )गोंदिया जिल्हा मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्याशी सुनावणीदरम्यान वकील संघांचे माजी अध्यक्ष अॅड. पराग तिवारी यांना मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजित कुलकर्णी यांनी ९० रुपये दंड किंवा पाच दिवसांचा सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली.
या प्रकरणामुळे जिल्ह्यातील वकिलांमध्ये गुरुवारी (ता.८) वातावरण तापले होते.या प्रकरणावर नाराजी व्यक्त करित तुमसर तालुका वकील संघाच्या वतीने ८ फेब्रुवारीला न्यायालय परिसरात लेखणी बंद (पेन डाउन) आंदोलन करण्यात आले. तसेच न्यायदंडाधिकारी यांच्या निर्णयाला अकायदेशीर ठरवून विरोध दर्शविण्यात आला. वकील पराग तिवारी यांची कारागृहातुन सुटका करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली.
सविस्तर असे की,५ फेब्रुवारी ला गोंदिया जिल्हा न्यायालयात धनादेश अनादर प्रकरणावर सुनावणी होती. पक्षकाराचे वकिल म्हणून पराग तिवारी हे न्यायालयात काही क्षण उशिरा हजर झाले. यावरून न्यायदंडाधिकारी कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली दरम्यान न्यायमूर्ती कडून करण्यात आलेल्या वक्तव्यावर पराग तिवारी यांनी आक्षेप घेतला. भरन्यायालयात न्यायदंडाधिकारी व वकिल पराग तिवारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली, न्यायालयात झालेल्या संभाषणामुळे परिणामी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल खोटे आरोप लावून तसेच आरोपाना सिद्ध न करता पराग तिवारी यांना स्वमर्जीने न्याया धीश कुलकर्णी यांनी तूर्त आर्थिक दंड व दंड न भरल्यास ५ दिवसाची शिक्षा सुनावली. यावर वकील तिवारी यांनी दंड न भरण्याची भूमिका घेतल्याने त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. न्यायालयाच्या निर्वाळ्यावर जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील वकिल संघाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.त्यातच तालुका वकील संघाकडून वकील पराग तिवारी यांना शिक्षा ठोठावल्या प्रकरणाला घेवून लेखनिबंद (पेन डाउन) आंदोलनाची हाक दिली. या आंदोलनाला जिल्ह्यातील वकिलांनी प्रतिसाद देत जिल्ह्यातील सर्व न्यायालयात लेखनीबंद आंदोलन केले.त्यामुळे येथे वकिलांच्या पेन डाउन आंदोलनामुळे न्यायालयाचे काम प्रभावित झाले.अश्या अनेक प्रकारनामुळे वकील असुरक्षित झाले आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी कोणताच कायदा अंमलात आणला गेला नाही. त्यामुळे असे प्रकार घडत आहेत. तेव्हा तातडीने वकील संरक्षण कायदा अंमलात आणावा, अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली.

——-@———
तुमसर तालुका वकिल संघ तिवारीच्या पाठीशी

अॅड.पराग तिवारी यांच्या प्रकरणात
जे घडले ते योग्य नव्हते. त्यामुळेच तालुका वकिल संघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे.वकिल संघ अॅड.तिवारी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार,न्याय व्यवस्थेत वकिलांची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे न्याय व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी सामंज्यातून प्रकरण समविण्यात सहकार्य केले पाहिजे. पराग तिवारी यांच्या बाबत न्यायालयाने घेतलेला निर्णय हा कायदेशीर नाही. या बाबीसाठीच लेखनीबंद (पेन डाउन) आंदोलन करण्यात येत आहे. अशी प्रतिक्रिया तालुका वकील संघांचे अध्यक्ष अॅड.विलासकुमार माटे यांनी प्रसार माध्यमाकडे व्यक्त केली.

Previous articleअशोक गलांडे एम ए पदव्युत्तर परीक्षेत चांदवड महाविद्यालयात प्रथम
Next articleनेवाशात ‘भाजप’ला फुटीचे ग्रहण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here