Home नागपूर आमदार नितीन राऊत ‘माजी मंत्री’ ऑटोला धक्का देतात तेव्हा. !

आमदार नितीन राऊत ‘माजी मंत्री’ ऑटोला धक्का देतात तेव्हा. !

29
0

आशाताई बच्छाव

IMG-20220711-WA0036.jpg

आमदार नितीन राऊत ‘माजी मंत्री’ ऑटोला धक्का देतात तेव्हा. !

मुंबई (अंकुश पवार, जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्यूज चॅनल अँड पेपर)

आज नागपुरात आश्चर्याचा सुखद धक्का देणारी ही घटना घडली! आपल्या मतदार संघात कामाची पाहणी करण्यासाठी फिरणारे आमदार आणि माजी मंत्रीच शाळेत जाणाऱ्या मुलांच्या ऑटो रिक्षाला धक्का द्यायला धावले तेव्हा त्यांच्या संवेदनशीलतेने सर्वांचीच मने जिंकून घेतली!
ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर जराही उसंत न घेता डॉ. नितीन राऊत यांनी आपल्या उत्तर नागपूर मतदारसंघाचा झंझावाती दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात जनतेच्या अडीअडचणी समजून घेवून त्यांच्या सुखदुःखात ते सहभागी होत आहेत. मतदारसंघात सुरू असलेल्या विकास कामांचा आज आढावा घेत असतानाच नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारात अगदी कुटुंबातील सदस्याप्रमाणे ते सामील झाले आहेत.
डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी यादवनगर भागातील भीम चौकात भेट दिली. त्यावेळी पावसामुळे झालेल्या चिखलात शालेय मुलांना घेऊन जाणारी ऑटोरिक्षा अडकून पडलेली त्यांना दिसली. हे दृश्य नजरेस पडताच संवेदनशील डॉ. राऊत हे शाळकरी मुलांबद्दलचे प्रेम व काळजी वाटून भावूक झाले. त्यांनी लगेच आपल्या गाडीतून खाली उतरून ऑटोरिक्षावाल्याला मदतीचा हात दिला. इतकेच नव्हे तर आपल्या कार्यकर्त्यांसोबत स्वतः ऑटोरिक्षाला धक्का देऊन ती चिखलातून बाहेर काढली. चक्क स्थानिक आमदार आणि राज्याचे माजी ऊर्जा मंत्री ऑटोला धक्का देत आहेत हे पाहून परिसरातील लोकही आश्यर्यचकित झाले. रिक्षा पुन्हा धावू लागताच ऑटोरिक्षातील विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Previous articleसप्तशृंगी गडावर ढगफुटी
Next articleभौरी शाळेत चिमुकल्यांची वारी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here