Home नागपूर संघर्ष बहुउद्देशीय संस्था नागपूर च्या वतीने प्रथम वर्धापन दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई...

संघर्ष बहुउद्देशीय संस्था नागपूर च्या वतीने प्रथम वर्धापन दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने

18
0

आशाताई बच्छाव

IMG_20240123_074733.jpg

संघर्ष बहुउद्देशीय संस्था नागपूर च्या वतीने प्रथम वर्धापन दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने

पुरस्कार वितरण सोहळा व नवोदित काव्य संमेलनाचे आयोजन 28 जानेवारीला हिंगणा येथे

नागपूर,( मोहन देशमुख ब्युरो चीफ)– संघर्ष बहुउद्देशीय संस्था नागपूर द्वारा संचालित अखिल भारतीय संत गाडगेबाबा साहित्य व कला मंच नागपूरच्या वतीने प्रथम वर्धापन दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने 28 जानेवारीला 2024 ला सकाळी 11 ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विश्वशांती वेणावन बुद्ध विहार गुमगाव रोड हिंगणा येथे कर्मयोगी संत गाडगेबाबा राज्यस्तरीय पुरस्कार व समाजभूषण पुरस्काराचे आयोजन करण्यात आलेले आहे . कार्यक्रमाचे उद्घाटन संजीव भांबोरे राज्य सरचिटणीस प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार आहे .प्रथम सत्र 11 ते 1.30 वाजेपर्यंत चालणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणिकराव खोब्रागडे माजी कृषी अधिकारी व ज्येष्ठ कवी व आंबेडकर विचारवंत दत्तवाडी नागपूर हे राहतील. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून दुशिला मेश्राम (दरेकर )गझलकार व मुख्याध्यापिका वानाडोंगरी, सुरेश मानवटकर सामाजिक कार्यकर्ते व संचालक शांती वेणावन बुद्ध विहार नाकाडोंगरी ,कार्यक्रमाचे संयोजक श्रावण गोसावी सचिव संघर्ष बहुउद्देशीय संस्था नागपूर यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील .दुसरे सत्र दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत चालणार असून नवोदित काव्य संमेलन यावेळी होणार आहे .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रत्ना यशवंत मनोहरे कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या नागपूर उपस्थित राहतील तर प्रमुख अतिथी म्हणून अस्तीन चौरे कवी व सामाजिक कार्यकर्ते नागपूर ,चंद्रशेखर बांबोळे ज्येष्ठ कवी व आंबेडकरी विचारवंत गडचिरोली ,सविता बनसोड कवियत्री तथा गझलकार वानाडोंगरी, सुभाष मानवटकर ज्येष्ठ कवी व सामाजिक कार्यकर्ते नागपूर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप शेंडे नागपूर करणार आहेत. वरील कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मोहनभाऊ पुडके उपाध्यक्ष संघर्ष बहुउद्देशीय संस्था नागपूर, पंकज भगत कोषाध्यक्ष, महेंद्र सुखदेवे ,धम्मदीप पानतावणे, मंगेश गुजर ,राहुल मेश्राम, अमित बागडे ,दीप्ती शेरके, नम्रता सरदार ,रचना हुमणे अमित मेश्राम यांनी केलेले आहे.

Previous articleसंघर्ष बहुउद्देशीय संस्था नागपूर च्या वतीने प्रथम वर्धापन दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने
Next articleअजिंक्य इंग्लिश मिडीयम स्कूलची गाव प्रदक्षिणा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here