Home उतर महाराष्ट्र अजिंक्य इंग्लिश मिडीयम स्कूलची गाव प्रदक्षिणा

अजिंक्य इंग्लिश मिडीयम स्कूलची गाव प्रदक्षिणा

59
0

आशाताई बच्छाव

IMG_20240123_075249.jpg

अजिंक्य इंग्लिश मिडीयम स्कूलची गाव प्रदक्षिणा

श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी)तालुक्यातील पढेगांव येथील अजिंक्य इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये अयोध्या येथे होणाऱ्या श्री.रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठाच्या निमित्ताने पंचक्रोशीतील गावोगावी प्रदक्षिणा करून एक अलौकिक सोहळा साजरा केला. यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. बाळासाहेबजी तोरणेसर यांच्या प्रेरणेतून आणि प्राचार्य श्री अभिजीत खरात सर यांच्या संकल्पनेतून स्कूलमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
या श्री राम लल्लांच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने स्कूल मधील विद्यार्थ्यांनी श्रीराम, बंधु लक्ष्मण, सीतामाई, श्री हनुमान यांची वेशभूषा परिधान केली होती. यामध्ये श्रीराम- चि.क्षिरसागर ऋषिकेश (इ.८ वी), बंधु लक्ष्मण – चि. गवळी शिवराज,(इ.५वी) सीतामाई – कु. जंजिरे श्रावणी (इ.७वी),तर श्री हनुमान – चि. येसेकर स्वरूप (इ.८वी) यांनी भूमिकेत रूपमान होऊन पढेगांव येथे झालेल्या श्री.श्री.१०८ स्वामी रामदासजी महाराज ( कर्नाल, हरियाणा) यांच्या कलश प्रदक्षिणा मिरवणूकीत सहभागी झाले होते.
तसेच ही प्रदक्षिणा पंचक्रोशीतील पढेगांव, मालुंजा, भेर्डापूर, लाडगाव, मातापूर याठिकाणी जाऊन पूर्ण केली. या प्रदक्षिणे मध्ये लेझीम पथक, श्रीरामांच्या जीवन चरित्रावर आधारित नृत्य यावेळी सादर करण्यात आले.
या ग्राम प्रदक्षिणेतून ग्रामस्था श्री राम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने भारावून गेले होते. पंचक्रोशीतील सर्वच गावांचा या प्रदक्षणेसाठी उत्तम प्रतिसाद मिळाला. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांकरिता प्रसाद, अल्पोपहार, आणि पाण्याची विशेष सोय उपलब्ध केली होती.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी स्कूलचे प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here