Home Breaking News कोरोना सारख्या महाभयंकर आजारात जवळचे नातेवाईक देखील रूग्णा जवळ येत नव्हते

कोरोना सारख्या महाभयंकर आजारात जवळचे नातेवाईक देखील रूग्णा जवळ येत नव्हते

175
0

सटाणा शशिकांत पवार (युवा मराठा न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी सटाणा ) कोरोना सारख्या महाभयंकर आजारात जवळचे नातेवाईक देखील रूग्णा जवळ येत नव्हते अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता या कोरोना ग्रस्त रुग्णांना जीवदान देण्याचे काम केले ते अतिशय सन्मानीय काम असून अशा आपल्या जीवाची पर्वा न करणाऱ्या कोरोना योद्धा मुळे या माहा मारीला काही प्रमाणात आपल्याला थांबवणे शक्य झाले असे गौरवोद्गार आमदार दिलीप बोरसे यांनी डांगसौंदाने येथे कोरोना काळात अविरत झटणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करताना सांगितले.
डांगसौंदाणे येथील ग्रामपंचायत यांच्या वतीने कोरोना योद्धा सन्मान सोहळा श्रीराम मंदिर सभागृहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जिजाबाई पवार तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील ,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत बच्छाव ,बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे ,शेतकरी मित्र बंडूशेठ शर्मा, विस्तार अधिकारी नितीन देशमुख आदी उपस्थित होते . या काळात विविध माध्यमातून समाजसेवा करणारे आरोग्य दूत ,पोलीस महसूल, पत्रकार ,आरोग्य सेविका ,खाजगी वैद्यकीय व्यावसायिक ,स्वच्छता कर्मचारी आदींचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
कोरोना योद्धा म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे चे सर्व कर्मचारी ,डॉक्टर जगदीश चौरे ज्,येष्ठ पत्रकार हेमंत चंद्रात्रे, पत्रकार निलेश गौतम ,खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर प्रदीप खैरनार ,डॉक्टर राहुल गायकवाड, पोलीस कर्मचारी हवालदार प्रकाश जाधव ,जगजित सिंह सोलंकी, निवृत्ती भोये ,तलाठी आतिश कापडणीस हिरालाल बाविस्कर संतोष दुसाने, विशाल नेरकर सुनील वाघ, आरोग्य सेविका अलका आहेर, हर्षद सोनवणे आदींचा आमदारांच्या हस्ते गौरव पत्र व सन्मानचिन्ह देऊन कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमास ग्रामपंचायतचे उपसरपंच सुशील कुमार सोनवणे, तंटामुक्तीचे अध्यक्ष पंढरीनाथ सोनवणे ,ग्रामपंचायत सदस्य विजय सोनवणे ,डॉक्टर सुधीर सोनवणे पंकज बधान ,सोपान सोनवणे बुंधाटे चे सरपंच नंदू बैरागी, रविंद्र सोनवणे ,राजेंद्र परदेशी ,जगदीश बोरसे महेश सोनवणे ,मंगेश बोरसे ,महेंद्र सोनवणे , मंगेश बोरसे निवृत्ती सोनवणे ,कैलास बोरसे, मनोहर सोनवणे ,धनंजय देशमुख ,ग्रामसेवक सचिन सूर्यवंशी ,प्रशांत आंबेकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त मुख्याध्यापक पंढरीनाथ बोरसे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here