Home माझं गाव माझं गा-हाणं पोलिसांना हप्ते देतो,पत्रकारांना थोडंच मोजतो” वासोळच्या सट्टाकींग ज्ञानेश्वरची मुजोरशाही!! पोलिसांचा धाक आहे...

पोलिसांना हप्ते देतो,पत्रकारांना थोडंच मोजतो” वासोळच्या सट्टाकींग ज्ञानेश्वरची मुजोरशाही!! पोलिसांचा धाक आहे आहेच की नाही….!!

416
0

राजेंद्र पाटील राऊत

“पोलिसांना हप्ते देतो,पत्रकारांना थोडंच मोजतो”
वासोळच्या सट्टाकींग ज्ञानेश्वरची मुजोरशाही!!
पोलिसांचा धाक आहे आहेच की नाही….!!
देवळा,(युवा मराठा न्युज ब्युरो टिम)– अवैध धंद्याचा बेताज बादशहा म्हणून ओळखला जाणारा वासोळ ,ता.देवळा येथील सट्टाकींग ज्ञानेश्वर पवार खुलेआमपणे वल्गना करतो की,”मी पोलिसांना हप्ते देतो, अशा बातम्या लिहणा-या पत्रकारांना थोडंच मोजतो!” हि मुजोरशाहीची हिंमत एका सट्टाकींग मध्ये येते कुठून?असा प्रश्न उपस्थित होत आहे.अवैध धंद्यातून गोरगरिबांच्या संसाराचे पार वाटोळे करणाऱ्या ज्ञानेश्वर पवारसारख्या सट्टाकींगला नेमका कुणाचा वरदहस्त आहे की,जेणेकरुन तो खुलेआम पोलिसांनाही आव्हान करतो.आणि देवळा येथील पोलिस मात्र याकडे साफ दुर्लक्ष करुन कारवाईत अक्षम्य कुचराई करतात.त्यामुळेच सट्टाकींग ज्ञानेश्वर पवार हा वासोळसारख्या परिसरातील शांतताप्रिय गावामध्ये शेजारील फुलेवाडी,महालपाटणे, खालप या गावामधील तरुण पिढीला सट्टा मटकासारख्या घातक जुगाराच्या नादी लावून त्यांचे भावी आयुष्य उध्वस्त करीत आहे.मात्र त्याचे हे अवैध व बेकायदेशीर साम्राज्य उध्वस्त करण्याचे धाडस पोलिस मात्र हे वृत लिहीत असेपर्यत दाखवू शकले नाहीत म्हणून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.या सट्टाकींग ज्ञानेश्वर पवारचा सट्टा मटका अड्डा हा कोलती नदीकाठी असल्याची सर्वदुर पर्यत माहिती असतानाही पोलिसांना त्याचा थांगपता लागू नये,म्हणजे सट्टाकींग पवारच्याच भाषेत सांगायचे झाले तर पोलिसांचे काही आर्थिक हितसंबंध तर या सट्टाकींगसोबत नाहीत ना?असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.
उद्या अवश्य वाचा सट्टाकींग पवारची शिरजोरी”
“कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी अमोल गायकवाड लगाम लावतील का आता तरी?” पवारला लोहणेरचे गाँडफादर कोण? सविस्तर सडेतोड रोखठोक बातमी!!

Previous articleकोरोना सारख्या महाभयंकर आजारात जवळचे नातेवाईक देखील रूग्णा जवळ येत नव्हते
Next articleदेवळा येथे 348 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी सरपंच यांच्या हस्ते शिव ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here