Home Breaking News *कधीच न विसरता येणार अश्या आपल्या रावळगावच्या क्रिडा शेत्रातील गोड आठवनी* नाशिक...

*कधीच न विसरता येणार अश्या आपल्या रावळगावच्या क्रिडा शेत्रातील गोड आठवनी* नाशिक ,

184
0

*कधीच न विसरता येणार अश्या आपल्या रावळगावच्या क्रिडा शेत्रातील गोड आठवनी* नाशिक , ( विष्णू अहिरे युवा मराठा न्युज नेटवर्क)
आज सगळे घरीच असतील या निम्मिताने सगळ्याना वेळ असल्या मुळे निवांत वाचता येईल व आपले बालपण आठवुन त्याला उजाळा तरी देता येईल, मालेगाव चे पण आपल्या गावा शी क्रिडा विशेष करुन क्रिकेट शी खुप जवळचे नाते होते आपण पण आपल्या आठवनी लिहुन पाठवा , आपण सविस्तर वाचाल व आपल्या आठवनी लिहुन पाठवाल अशी अपेक्षा करतो, मित्रानो आता जागतिक आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे त्यामुळे भरपूर वायाम करा आनंदी रहा राजकारण जातिभेद विसरुन हे विश्वची माझे घर या नियमाने सगळे मनमोकळे मनानेजगा बाकी काही सोबत येत नाही.ते आपल्या रावळगाव चे सोनेरी दिवस आठवले की मन भरुन येते, कधी न विसरता येणारे आपले क्रिडा, कला संस्कृती, माणुसकी, परंपरा जपणारं आपले ते सुंदर गाव ची आज खुप आठवन आली म्हणून पुन्हा आज मला त्यास उजाळा दयावा असे वाटले आणी त्यामुळेच पुन्हा एकदा हे फोटो आपल्या साठी पाठवण्याची ईच्छा झाली, चला मग त्या गोड आठवणीत रमून जाऊ या.सलाम त्या जन्मभूमीला व क्रिडा नगरिला. वालचंद हिराचंद उद्याेग समुहा तर्फे क्रिडा स्पर्धा घेतल्या जायच्या. रावलगाव क्रिकेट मधे 1968 साली उमेश दोशी नावाचे क्रिकेट वादळ कंपनी मधे दाखल झाले भाऊ नी सूत्र हातात घेतले आणी गुणी सहकारी खेळाडूचे मनोबल वाढवत आखेर १९७८ साली घेतल्या गेलेल्या क्रिकेट स्पर्धेत रावळगांव शुगर फार्म लि चा संघ विजयी झाला ही स्पर्धा जिक्ंने हे आपल्यासाठी सोपे नव्ह्ते कारन विरुध्द संघात त्या वेळी भारतिय क्रिकेट गाजवलेले चंदू बोर्डे सारखे खेळाडू खेळत होते आणी शहर आणी ग्रामीण भाग हा मोठा फरक होता विजयी रावळगांव संघाला जेनिफर कपुर यांच्या हस्ते पारीताेषिक देऊन गौरवण्यात आले, ही नावलौकिक प्राप्त क्रिकेट खेळण्याचे भाग्य मला लाभले हे माझे नशीब समजतो ही संधी मला उमेश भाऊ नी दिली भाऊ चे खुप खुप आभार. विजेता संघाचा हा दुर्मिळ फाेटाे बघुन रावळगांवच्या क्रिडा क्षेत्रातील आठवणी ताज्या झाल्या, नासिक जिल्ह्यातील अंतर महाविद्यालयीन किंवा खुल्या क्रिकेट स्पर्धा असतील त्यात रावळगांवचे खेळाङु नेहमीच अग्रेसर असायचे,आपल्या रावळगांवच्या खेळाङुंनी विद्यापीठ, राज्यस्तरावर प्रतिनिधीत्व केले आहे, मला आज हा १९७८/ ७९ सालचा आपल्या विजयी संघाचा फाेटाे मिळाला म्हनुन क्रिकेट च्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला, रविवारी मालेगांव चा क्रिकेट संघ रावळगांव च्या सुसज्ज मैदानावर क्रिकेट मॅच खेळण्यासाठी यायचा सामना पहाण्यासाठी आलेली प्रचंङ गर्दी व उत्साह आजही सुखद आठवणी देताे आहे, मालेगावच्या टीम टायगर, नॅशनल,शिवाजी जिमखाना, लाॅयन, सम्राट, हे संघ व खेळाङु आजही मालेगांवी भेटले कि रावळगांव क्रिकेट बद्दल भरभरुन बाेलतात, त्या काळातील रावळगांवचे प्रतिभावान क्रिकेट पटु उमेश दाेशी, प्रेमसिंग परदेशी, शिवाजी काेळी, प्रकाश गायकवाङ , कै सुनिल प्रभुणे, कै शशी दादा, उल्हास प्रभुणे, रामसिंग परदेशी, माेहन कुलकर्णी,प्रमाेद महाले, प्रमाेद देशपांङे सुभाष हिरे,राजु गाेसावी, मिलींद हळबे,उल्हास खंबेटे,यांचा आदर्श घेउन आम्ही पुढे रावळगांवचा क्रिकेट वारसा चालविला व नाशिक जिल्ह्यात अनेक स्पर्धा गाजविल्या, त्यात सुदेश गाेसावी, देवेन्द कुलकर्णी, शरद हिरे, प्रशांत गरुङ, राजू पवार , जिल्हनी शैख ,प्रदिप वाघमारे,कै शांताराम शिल्लक, तुषार देशपांङे, संजय निमगुळकर, रमेश चौधरी,वाल्मिक जाधव, राजेंन्द्र कुलकर्णी,महेश खरे, ललीत विखरणकर,कैलास पटेल, प्रविण पटेल,गाेपी महाले, संजय सिंग, प्रमाेद महाजन,राजु शेलार, श्याम पाटील, दिपक चव्हाण, नंदु पटेल, अतुल कुलकर्णी,पांङुरंग पगारे,सुरेश मानुर,शंकर अहिरे, सुनिल कदम,बापु शिंदे, प्रदिप संसारे,सुरेश फसाले,साहेबराव पवार,कैलास पवार,संजय पवार, भरत थाेरात, अशा गुणवंत खेळाङुंचा माेलाचा वाटा हाेता, खरच रावळगांव शुगर फा्र्म ही सर्व खेळाची नगरी हाेती हे म्हणने वावगे ठरणार नाही, क्रिकेट, फुटबाॅल, व्हालीबाॅल, कबङ्ङी, खाेखाे, बास्केटबाॅल, हे मैदानी व कॅरम टेबल टेनिस, बॅङमिंटन, हे इनङाेअर खेळ येथे तंत्र शुध्द पध्दतीने खेळले जायचे, नासिक जिल्हयात एकमेव वुङन बॅङमिंटन काेर्ट त्या काळी रावळगांवात हाेते , हे रावळगांव शुगर फार्म चे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दाेशी साहेब यांच्या क्रीङा प्रेमामुळेच आम्हांला शक्य झाले,त्यांनी वेळाेवेळी क्रीङा साहीत्य व सुविधा पुरविल्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकलाे, अभिमानाने सांगावेसे वाटते की 1995 साली नासिक जिल्हामधे पाहिले wooden badminton court श्रीमान शेट्जी नी आम्हास रावळगावी बांधून दिले, शेट्जी आम्ही आपले आभारी आहाेत, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व माजी निवङ समिती अध्यक्ष चंदु बाेर्ङे हे वालचंद ग्रुप क्रिकेट स्पर्धेत रावळगांव शुगर फार्म लि च्या संघाविरुध्द रावळगांव या आपल्या मैदानावर खेळले ते भाग्य आम्हांस लाभले ही आपल्या साठी अभिमानाची बाब आहे,या पुण्यभुमीला,मायभुमीला माझे शतशा प्रणाम,आपला गुणी खेळाङु दिव्यंगत सुनिल प्रभुणे तीन वर्षा पुर्वी आपणास अचानक साेङुन अनंतात विलीन झाले, तसेच दिव्यंगत शशी दादा देशपांङे यांना रावळगांव वासीयांतर्फे व माझ्या सहकारी खेळाङु कङुन आदरांजली अर्पण करताे, तसेच परवा आमचा गुणी खेळाडू वाल्मिक विक्रम जाधव हा आम्हास सोडूंन स्वर्गवासी झाला त्यास ही आपल्या सर्वा तर्फे श्रध्दांजली अर्पण करतो, दिवंगत सर्व स्वर्गवासी आमच्या सहकारी मित्राना परमेश्वर चिरशान्ती देवो ही प्रार्थना करतो तसेच जगावर आणी आपल्या देशावर आलेले कोरोना रुपी संकट देव दुर करो अशी आपल्या सर्वा तर्फे प्रार्थना परमेश्वरा कडे करतो, स्वतची काळजी घ्या, धन्यवाद

Previous articleदहावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता होणार जाहीर
Next articleपरभणी आरोग्य विभागाने हलगर्जी पणाचे गाठले कळस – एका निरोगी इसमास चुकून बाधित समजून उचलले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here