Home Breaking News परभणी आरोग्य विभागाने हलगर्जी पणाचे गाठले कळस – एका निरोगी इसमास चुकून...

परभणी आरोग्य विभागाने हलगर्जी पणाचे गाठले कळस – एका निरोगी इसमास चुकून बाधित समजून उचलले

157
0

परभणी आरोग्य विभागाने हलगर्जी पणाचे गाठले कळस – एका निरोगी इसमास चुकून बाधित समजून उचलले

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

परभणी, दि.२८ – मनपाच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असतानाही शनिवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास रुग्णवाहिका घरासमोर आणून पॉझिटिव्ह असल्याचे सांगत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्या ठिकाणी कर्मचाऱ्याच्या पॉझिटिव्ह अहवाला संदर्भात कोणतीही कागदपत्रे न आढळल्याने त्यास परत घरी रवाना करण्यात आले.

दरम्यानच्या काळात या कर्मचाऱ्याच्या घराचा परिसर महापालिकेने सील केला. परंतु काही वेळा नंतर निगेटिव्ह अहवाल असल्याचे सांगत पुन्हा बॅरिकेटस् काढण्यात आले. आरोग्य विभागाच्या या गलथान, हलगर्जी पणाच्या कारभारामुळे नागरिकांमधून मात्र तिवृ नाराजी व्यक्त करण्यात असून यामुळे संबंधित कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांनाही मानसिक त्रास सहन करावा लागला आहे.

येथील महानगरपालिकेत आरोग्य विभागात काम करणारा एक कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने १५ जुलै रोजी स्वत: हून विलगीकरण कक्षात दाखल झाला होता. १६ जुलै कर्मचाऱ्याने स्वॅब नमुना दिला. त्याचा अहवाल साधारणत: तीन ते चार दिवसांनी येणे अपेक्षित असताना ८ दिवसांनी उशिरा प्राप्त झाला. अहवाल निगेटिव्ह आला. पण संबंधितांना तो पॉझिटिव्ह वाटला होता.

Previous article*कधीच न विसरता येणार अश्या आपल्या रावळगावच्या क्रिडा शेत्रातील गोड आठवनी* नाशिक ,
Next articleदेवळा देवळा तालुक्यात कोरणा रुग्णांची आज विक्रमी वाढ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here