Home युवा मराठा विशेष बहिण असावी प्रत्येकाला अशी,ज्यामुळे मिळेल सगळ्यांना खुषी! आमचा आधारस्तंभ माझी मेव्हण बहिण...

बहिण असावी प्रत्येकाला अशी,ज्यामुळे मिळेल सगळ्यांना खुषी! आमचा आधारस्तंभ माझी मेव्हण बहिण बच्छाव आशा,तिनेच दाखविल्या मला सन्मार्गाच्या दिशा!!

145
0

राजेंद्र पाटील राऊत

FB_IMG_1654935923890.jpg

बहिण असावी प्रत्येकाला अशी,ज्यामुळे मिळेल सगळ्यांना खुषी!
आमचा आधारस्तंभ माझी मेव्हण बहिण बच्छाव आशा,तिनेच दाखविल्या मला सन्मार्गाच्या दिशा!!
(वाढदिवस विशेष लेख)
✍️ राजेंद्र पाटील राऊत
रक्ताच्या नात्यापेक्षा आपुलकीची,जिव्हाळ्याची व माणूसकीची जपलेली नाती केव्हाही श्रेष्ठच ठरतात.त्यात स्वार्थ किंवा आपमतलबीपणा नसतो.रक्ताच्या नात्यात स्वार्थासाठी भांडणे,वादविवाद,लढाया होऊन खुनासारखे गंभीर प्रकारही घडल्याचे आपण बघतच असतो.तरीही माणसाला स्वतःच्या जीवनात एक सुख -शांती व स्थैर्य मिळवून देणाऱ्या खास अशा नात्याची गरज असते आणि प्रत्येक माणूस अशाच एका नात्यासाठी आई,बहिण,भावाच्या रुपाने खरे आपुलकीच्या व्यक्तीची आयुष्यभर वाट पाहत असतो.अन माझ्या आयुष्यात देखील योगायोगाने माझ्याच नात्यातील असलेली मेव्हणबहीण मला लाभली.
खरे तर लहानपणापासून मला जवळचे असे खास कुणी आपलेसे करणारे जीव लावणारे आप्तस्वकीयच नाहीत.सगळेच नातेवाईक मतलबी! तेव्हापासूनच खरे बहिणीच्या प्रेमासाठी हे मन आसुसलेले होते.आणि ती उणीव कमतरता माझ्या या मेव्हण बहिणीने मला कधीच जाणवू दिली नाही.ती वयाने माझ्यापेक्षा जरुर लहान असेल परंतु विचाराने व बुध्दीने नक्कीच महान आहे.त्यामुळे परमेश्वराने खरोखरच प्रत्येकाला अशी बहिण द्यावी की,ज्यामुळे सगळ्यांना खुषीच होईल!माझ्या जीवनाचा खरा आधारस्तंभ ठरलेली,मला नेहमीच सुख दुःखात खंबीरपणे पाठीशी उभी राहून लढण्याचे बळ देणारी माझी ती मेव्हणबहिण माझ्यापेक्षा वयाने चार ते पाच वर्षानी लहान आहे.तिचा जन्म जुन महिन्यातील १२ तारखेचा १९७६ सालातला!आज तिचे वय अवघे ४६ वर्षाचे आहे.मात्र तिचे कार्य बघून आपोआपच तिच्यापुढे नतमस्तक व्हावे लागते.अशा त्या माझी मेव्हणबहिण श्रीमती आशाताई बच्छाव विषयी हा आठवणीतला शब्दपसारा तिच्याच वाढदिवसानिमित लेख रुपाने मांडत आहे.
माझे जन्मगाव अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तर माझी मेव्हण बहिण श्रीमती आशाताई बच्छाव हिचे जन्मगाव नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील व-हाणे.पुढे हेच तिचे सासर व माहेर ठरले.माझ्या आईचे माहेर व-हाणेजवळील कौळाणे (नि.)हे.तर श्रीमती आशाताई बच्छाव ही माझ्या आईच्या मामाच्या मुलाची मुलगी.अशा त-हेने हे गुंफलेले नाते माझ्या आजोळकडील असल्याने व दुर्दैवाने माझ्या लहानपणीच माझे वडील वारल्याने मग मी देखील याच व-हाणे ,कौळाणे भागात लहानाचा मोठा झालो.त्यामुळे साहजिकच अगदी लहानपणापासून शेजारील व-हाणे गावी मेव्हणबहिणीच्या घरी श्रीमती आशाताई बच्छाव पुर्वाश्रमीची आशा दादाजी शेवाळे अर्थात आमची लाडकी अक्का!आजही तिला मोठया आवडीने आम्ही अक्काच म्हणतो.लहानपणापासूनच एकत्रित राहिलेली,वाढलेली , मोठी झालेली श्रीमती आशाताई बच्छाव (अक्का) हिच्याकडे आज बघितल्यावर क्षणभर विचार करायला होते की,लहानपणी क्वचितच बोलणारी अबोलसारखी वाटणारी ही अक्का पुढे खरंच इतकी हुशार व बुध्दीमान ठरेल असे स्वप्नातही वाटले नव्हते.मात्र माणूस हा अनुभवाने शहाणा होतो.त्यातूनच त्याला खरे ज्ञानाची प्राप्ती होते.असाच अनुभव मला तरी श्रीमती आशाताई (अक्काच्या) आलेला! सासरी व माहेरी अत्यंत प्रतिकुल परिस्थिती असतानाही तिने मोठया धाडसाने व हिंमतीने दोन्हीही घराण्यांचा नावलौकिक कायम राखून आपल्या गृहलक्ष्मीची कर्तृत्वे पार पाडतांना अत्यंत हाल अपेष्ठांना तोंड देऊन स्वतः चा संसार सुखाचा केला.त्यामुळेच परमेश्वराने खरोखरच अशी बहिण प्रत्येकाला द्यावीच हिच माफक अपेक्षा !प्रत्येक व्यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो असे म्हणतात.परंतु माझ्या यशामागे माझ्या या मेव्हणबहिणीचा फक्त हातच नव्हे तर बहुमोल सिंहाचा वाटा आहे.मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून पत्रकारितेत आहे.मी याच क्षेत्रात नाव कमावून आपले भवितव्य घडवावे म्हणून मला सततच प्रोत्साहन देणारी माझी मेव्हणबहिण श्रीमती आशाताई बच्छाव (अक्का)प्रसंगी मला चार शब्द खडसावून बोलली तरी मी त्याचा राग कधीच बाळगला नाही.मी सुधारुन खुप मोठे व्हावे,नाव कमवावे हिच तिची प्रामाणिक इच्छा! माझी मेव्हणबहिण श्रीमती आशाताई बच्छाव हिला आम्ही सर्वच जण अक्का याच नावाने संबोधित.पुढे काय घडणार याचा विचार करण्याऐवजी पुढे काय घडविणार याचा विचार जास्त करायची.आपले भविष्य हे आपण आपल्या हाताने,बुध्दीने व इतरांच्या मदतीने घडवायचे असते असेच ती मानते.असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असा विचार तिने कधी केला नाही.आपला हरी फक्त संधी निर्माण करुन देतो अशीच तिची कल्पना असते.ती नेहमी म्हणत असते.देवाने उदार हस्ते आपल्याला अनेक अमुल्य गोष्टी दिल्या आहेत.डोळे,कान,मेंदू एवढया गोष्टी दिल्या असताना आपण आपले आयुष्य सुखात जावे यासाठी दैवावर विसंबून राहणे म्हणजे देवाच्या देणगीचा अपमान करण्यासारखे नाही का?समजा आपल्या जीवनात आपल्याला यश मिळणार आहे असे लिहले आहे पण आपण कर्तृत्वच केले नाही तर आपल्याला यश कोठून मिळेल? म्हणूनच आपल्याला जर आपल्या भविष्याचा खरा कारागीर बनायचे असेल तर आपल् कार्य कर्तृत्वाने जीवन घडवेन असा निर्धार केला पाहिजे.मात्र कर्तृत्वाच्या मार्गात नशिबाचा अडसर उभा करण्याऐवजी नशिबाला कर्तृत्वाची जोड द्यावी हे लक्षात घेतले पाहिजे.संतानी सुध्दा प्रयत्नांचाच पाठपुरावा केला आहे असे माझ्या मेव्हणबहिणीचे श्रीमती आशाताई बच्छाव हिचे विचार आहेत.आज तिच्याच प्रेरणेतून व सततच्या प्रोत्साहनामुळे आश्रयआशा फाऊंडेशन या बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक व विधायक कार्य करतांना खरे तर एक वेगळाच आनंद निर्माण होतो.श्रीमती आशाताई बच्छाव हिच्या नेहमीच्या तगाद्यामुळे “राजू,तु हे करच”या सल्ल्यामुळे युवा मराठा न्युजपेपर्स अँन्ड वेब न्युज चँनल महाराष्ट्राच्या सुमारे वीस जिल्ह्यात व्यशस्वीरित्या कामगिरी वाढवू शकले आहे.हे सारे श्रेय आशाताईचे एकटीचे आहे.मी मात्र निमित ठरलो आहे.माझा कर्ता करविता माझी मेव्हणबहिण आहे.ती पडद्यामागे राहूनच जीवनाची सारी सुत्रे रंगवीत आली आणि पडद्यावर हिरो म्हणून मला मात्र नावारुपास आणले.वास्तविक माझ्या प्रगतीची व सन्मार्गाच्या दिशा मला दाखविणारी खरी हिरोच ती आहे!
एक मात्र खरे की, मी स्वतः कधीच देव पाहिला नाही.परंतु माणसाच्या रुपाने मला देव म्हणून भेटलेली मेव्हणबहिण श्रीमती आशाताई बच्छाव (अक्का)हिने मला कधी दुःखी बघितलेले नाही किंवा अनाथपणाच्या यातना माझ्या वाटयाला येऊ दिल्या नाहीत.कितीही मोठे दुःख असले तरी सदा हसतमुख राहुनच त्याचा प्रतिकार करण्याची शिकवण या मेव्हणबहिणीनेच मला दिली.दिवसातून निदान एकदा का असेना माझी चौकशी फोनवरुन का होईना चौकशी करणारी अशी बहिण प्रत्येकालाच मिळावी म्हणजे जीवन किती सुखमय होऊन जाईल.अशा कर्तव्यकठोर असलेल्या परंतु मनातून मायेचा पाझर निर्माण करणाऱ्या माझ्या मेव्हणबहिणीच्या श्रीमती आशाताई बच्छाव (अक्का) हिच्या आजच्या वाढदिवसानिमित तिला दिर्घायुरोग्य लाभो व तिची उतरोतर प्रगती होवो हीच माझी व्यक्तीश शुभेच्छा बहाल करुन आश्रयआशा फाऊंडेशन ,युवा मराठा न्युजपेपर्स अँन्ड वेब न्युज चँनल,राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ महाराष्ट्र परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आठवणीला हा शब्दप्रपंच येथेच संपवतो!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here