Home जालना विनामुल्य ॲम्बुलन्सच्या वर्धापन दिनानिमित्त चालकाचा सत्कार

विनामुल्य ॲम्बुलन्सच्या वर्धापन दिनानिमित्त चालकाचा सत्कार

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20230819-WA0112.jpg

विनामुल्य ॲम्बुलन्सच्या वर्धापन
दिनानिमित्त चालकाचा सत्कार
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) ः  नागपूर – पुणे रस्त्यावरील कन्हैयानगर चौफुली जवळ ज. न. म संस्थान नानिजधाम विनामुल्य ॲम्बुलन्स सेवेला एक वर्ष पूर्ण झाल्याने ॲम्बुलन्सच्या वर्धापन दिनानिमित्त हार घालून तसेच नारळ फोडून व ॲम्बुलन्सचे चालक राजू चव्हाण आणि दक्षता अधिकारी योगेश बहुले यांचा सत्कार करण्यात आला.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नानिजधाम यांच्या माध्यमातून चालणारी विनामूल्य ॲम्बुलन्स सेवा ही रस्त्यावरील अपघात ग्रस्त व्यक्तींसाठी 24 तास कार्यरत असून कन्हैयानगर चौफुली ते देऊळगावराजा, कन्हैयानगर चौफुली ते सिंदखेड राजा पर्यंत व कन्हैयानगर चौफुली ते सोमठाणा फाटा बदनापूर पर्यंत या राष्ट्रीय महामार्गावरती कोठेही वाहनांचा अपघात झाल्यास 8888263030 किंवा 8999940875 या क्रमांकावर संपर्क केल्यास तात्काळ  ॲम्बुलन्स त्या अपघाताच्या ठिकाणी पोहचेल आणि त्या अपघात ग्रस्त व्यक्तींना लवकरात लवकर जवळच्या रुग्णालयात दाखल करून अपघातग्रस्त व्यक्तीचे प्राण वाचण्यास मदत होते. अपघातग्रस्त व्यक्तीकडून एकही रुपया न घेता मागील एक वर्षापासून या रस्त्यावर 24 तास कार्यरत असते. आजपर्यंत रुग्णवाहिकेच्या माध्यमातून  एका वर्षामध्ये 38 अपघातग्रस्तांची मदत करण्यात आली. दरम्यान, या ठिकाणी उभी असलेली ज. न. म. संस्थानची  विनामूल्य ॲम्बुलन्स सेवेच्या माध्यमातून 77 रुग्णांचे  प्राण वाचवण्यात यश आले.
यावेळी वर्धापन दिन साजरा करण्यासाठी जिल्हा निरीक्षक विजय देशपांडे, जिल्हाध्यक्ष नवनाथ पवार, मधुकर पवार, देवीलाल भगत, जिल्हा सचिव अमोल निंबाळकर, योगेश बहुले, प्रवीण निंबाळकर आदींची उपस्थिती होती.

Previous articleरामगव्हाण- टाका- दोदडगाव रस्त्याचाही प्रश्न मार्गी: समृद्धी कारखान्याने घेतला पुढाकार
Next articleओझर येथील प्रशांत भरवीरकर यांना पीएच.डी प्रदान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here