Home जालना जालना पिथीयन कॉन्सीलची स्थापना

जालना पिथीयन कॉन्सीलची स्थापना

126

आशाताई बच्छाव

Screenshot_20231031-072425_WhatsApp.jpg

जालना पिथीयन कॉन्सीलची स्थापना
जालना/दिलीप बोंडे ब्युरो चीफ – आंतरराष्ट्रीय पिथीयन कॉन्सीलच्या अंतर्गत संस्थापक बिजेंदर गोयल यांच्या आदेशान्वये व ध्यानचंद भोला व लक्ष्मण सर यांच्या मार्गदर्शनाखाली जालना पिथीयन कॉन्सीलची स्थापना करण्यात आलेली आहे.
कॉन्सीलच्या अध्यक्षपदी शेख चाँद पी.जे., उपाध्यक्ष प्रा.डॉ. हेमंत वर्मा, श्रीमती वैशाली सरदार, श्रीमती गायत्री सोरटी, सचिव सचीन आर्य, सहसचीव सुभाष पारे, सोपान शिंदे, अ‍ॅलेक जॅकब, कोषाध्यक्ष विजय गाडेकर, कार्यकारीणी सदस्य राजेभाऊ मगर, साजेद नजाब, देवा चित्राल, ऋषींद्र डोंगरे यांची सर्व संमतीने निवड करण्यात आलेली आहे.
पिथीयन कॉन्सीलच्या माध्यमातुन क्रीडा प्रकारातच नव्हे तर कला, साहित्य व सांस्कृतीक प्रकारात सुद्धा जिल्ह्यातील खेळाडु, कलाकार यांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येईल असे नव निर्वाचीत कार्यकारणीने यावेळी स्पष्ट केले असुन याचाच एक भाग म्हणुन लवकरच जालना पिथीयन फेस्टीवल आयोजीत करण्यात येणार आहे.
जालना जिल्ह्यातील स्पोर्टस क्लब, डान्स क्लब, गायन, वादन, कला क्षेत्रातील शिक्षक, प्रशिक्षक, मार्गदर्शक, विद्यार्थी, खेळाडु, कलाकार यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन ही यावेळी नवनिर्वाचीत कार्यकारीणीने केले आहे.

Previous articleविभागीय स्तरीय 17 वर्षा खालील शालेय योगासन स्पर्धेत कृष्णा भारत परदेसी आर्यन बिंगी व 14 वर्षा खाली आदेश मोहन नागरे चे यश
Next articleहलगरा , लातूर – गुणरत्न सदावर्ते याच्या अंत्यात्रा वेळी हलगरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.