Home गडचिरोली पत्नीला आणायला सासुरवाडीला आलेल्या जावयाने विष पिऊन संपवले स्वता:चे जिवन। आष्टीत घडली...

पत्नीला आणायला सासुरवाडीला आलेल्या जावयाने विष पिऊन संपवले स्वता:चे जिवन। आष्टीत घडली घटना

134

आशाताई बच्छाव

IMG-20220531-WA0031.jpg

पत्नीला आणायला सासुरवाडीला आलेल्या जावयाने विष पिऊन संपवले स्वता:चे जिवन।
आष्टीत घडली घटना
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):सासुरवाडीला पत्नीला आणायला आलेल्या जावयाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना आष्टी दिं.31 मे मंगळवारी घडली.

आत्महत्या केलेल्या विवाहित युवकाचे नाव योगेश आकाराम बन्सोड वय 34 वर्ष रा. इंदिरानगर नागपुर असे असुन सदर युवक हा 30 मे ला सायंकाळी 6 वाजताचे दरम्यान आष्टि येथील त्याचे सासरे धनराज देठे यांचे घरी आपली पत्नी स्नेहा हिला आपले स्वगृही नागपुर ला नेण्यासाठी आला होता.सासरे धनराज देठे यांनी जावयी आले म्हणुन त्यांचा पाहुणचार केला जेवन झाल्यानंतर मृतक योगेश व त्याची पत्नी स्नेहा बाहेर राञी फिरायला गेले राञी 11 वाजता घरी परतले.तेव्हा त्या दांपत्याची झोपण्याची व्यवस्था घरात करुन सासु सासरे हे घराच्या छतावर झोपी गेले.राञी 1 वाजे पर्यंत पती पत्नी सुख संसाराचे स्वप्न रंगवीत गोष्टि गप्पा करित राहिले.यानंतर पाहाटेच्या सुमारास 4 वाजता उलटी करित असल्याचा आवाज आल्याने सासु सुमिञा देठे ह्या खाली आल्या तेव्हा जावई उलटि करित असतांना दिसले तेव्हा सासूने त्यांना विचारना केली कि असे काय झाले आपण उलटी करित आहात तेव्हा जावई यांनी सागीतले कि मि पायजनयुक्त औषधी घेतली तेवढ्यात त्यांची प्रकृती गंभीर दिसत असल्याने उत्तम ताकसांडे यांच्या दुचाकिने ग्रामिण रुग्णालयात आष्टि येथे उपचारासाठि दाखल करण्यात आले.उपचार करतेवेळी तेव्हा डॉ. यांनी त्याच्याशी बोलले असता मि पानठेल्यातुन पुडी घेतली व खाल्ली असे उत्तर दिले.त्याचेवर उपचार सुरु असत्यांना त्याची प्राणज्योत 31 मे ला जवळपास 5 वाजताच्या सुमारास मावळली.

रुग्णालयातुन एम एल सी पोलिस स्टेशन ला पाठवले होते म्हणुन पोलिस रुग्णालयात दाखल झाले व पंचनामा करुन शव विच्छेदन करण्यात आले.

माञ त्या नातलगांना हि बातमी मिळताच त्याची आई व नातलग ग्रामीण रुग्णालयात येऊन माझ्या मुलाचा मृत्यू कसा झाला याची चौकशी करून न्याय घावा अशी मागणी केली आहे.परंतु मृतकाने एक चिठ्ठी लिहुन ठेवली आहे त्यामध्ये पत्नीला मटले कि मि तुझ्यावर खुप प्रेम करतो. सासू सासरे व ईतरांचे नावे लिहुन मला माफ करा.
खरच हि चिठ्ठी त्यांने लिहिली आहे का याचा तपास पोलिस करनार आहेत.त्यानंतरच या आत्महत्येचे गुढ निकाल लागल असे दिसत आहे.