Home जालना रामगव्हाण- टाका- दोदडगाव रस्त्याचाही प्रश्न मार्गी: समृद्धी कारखान्याने घेतला पुढाकार

रामगव्हाण- टाका- दोदडगाव रस्त्याचाही प्रश्न मार्गी: समृद्धी कारखान्याने घेतला पुढाकार

118

आशाताई बच्छाव

IMG-20230819-WA0100.jpg

रामगव्हाण- टाका- दोदडगाव रस्त्याचाही प्रश्न मार्गी: समृद्धी कारखान्याने घेतला पुढाकार

अंबड/जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)-: समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांनी आतापर्यंत 250 किलाे मीटरचे शेत पाणंद रस्ते स्वखर्चातून पूर्ण केले आहे. शेतकऱ्यांचे रस्ते खुले करण्याची ही मोहिम पावसाळयातही सुरू आहे. गुरूवारी नालेवाडी येथील नालेवाडी-रामगव्हाण व रामगव्हाण ते  सरगर वस्ती दरम्यानच्या रस्त्याचे काम झाल्यानंतर शुक्रवारी रामगव्हाण खुर्द ते रामगव्हाण बुद्रुक व टाका ते दोदडगाव दरम्यान असलेल्या रस्त्याचे काम सतीश घाटगे यांनी सुरू केले.
अंबड तालुक्यातील रामगव्हाण खुर्द ते  रामगव्हाण बुद्रुक व टाका ते दोदडगाव शिवारातील रस्ता शेतकऱ्यांसाठी महत्वाचा होता. अनेक वर्षापासून हा रस्ता दुरूस्त करण्याची मागणी  दोन्ही गावातील शेतकऱ्यांची होती. अंबड बाजार समितीचे उपसभापती अरूण घुगे यांनी हा रस्ता समृद्धी कारखान्यामार्फत करून देण्याची विनंती सतीश घाटगे यांच्याकडे केली होती. त्यानुसार सतीश घाटगे यांनी शुक्रवारी  रामगव्हाण खुर्द ते रामगव्हाण बुद्रुक व टाका ते दोदडगाव रस्त्याच्या कामास सुरूवात केली. भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सरपंच कांता बापू म्हस्के, उपसभापती अरुण घुगे, सरपंच रामेश्वर वैद्य, शेरूभाई पठाण,  दिनेश चेपटे, भास्कर चेपटे, मुसाभाई शेख, अकबर शेख, दादा पांढरे, किशोर सरकार, बाळू पांढरे, संपत डोमाळे, नवनाथ चेपटे, गणेश चेपटे, पप्पू  सरगर यांची उपस्थिती होती.

Previous articleजळगावात  एक श्याम देश के नाम हा कार्यक्रम उत्साहात संपन्न             
Next articleविनामुल्य ॲम्बुलन्सच्या वर्धापन दिनानिमित्त चालकाचा सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.