Home जालना अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समिती भोकरदन व जाफराबाद तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक...

अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समिती भोकरदन व जाफराबाद तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.

166
0

Yuva maratha news

1000322025.jpg

अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समिती भोकरदन व जाफराबाद तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.
माहोरा.. प्रतिनिधी- मुरलीधर डहाके दिनांक 27/04/2024
याविषयी सविस्तर वृत्त असे की,आज दिनांक 27/04/2024 रोजी जाफराबाद तालुका आणि भोकरदन तालुका कार्यकर्त्यांची बैठक अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या आदेशानुसार व प्रदेशकार्यध्यक्ष श्री वसंतराव देशमुख अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या सुचनेनुसार समितीची बैठक पींपळगाव रेणुकाई येथे संपन्न झाली.यामध्ये भ्रष्टाचराविरुद्धच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली.गावं तेथे शाखा हि कल्पना राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांची असून ती आपण शंभर टक्के आमलात आणणार असुन त्याची सुरुवात सुरू झाली असल्याचे प्रदेशकार्याध्यक्ष श्री वसंतराव देशमुख यांनी म्हटले आहे.या बैठकीला अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जालना जिल्हाध्यक्ष श्री कृष्णा लहाने, जिल्हा सचिव श्री मुरलीधर डहाके, श्री रामदास कदम पाटील तालुका अध्यक्ष जाफराबाद,भोकरदन तालुका अध्यक्ष श्री बालासाहेब देशमुख, भोकरदन तालुका संपर्क प्रमुख श्री शालीकराम आहेर, श्री हरीश सपकाळ माजी सैनिक यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावागावात भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या बैठका घेऊन शाखा ओपनिंग करून भ्रष्टाचारविरोधी जनजागृती करुन शासन व प्रशासन यांचा भ्रष्टाचारी चेहेरा जनतेच्या समोर आणणार असुन भविष्यात भ्रष्टाचाराचा बुरखा फाडून भ्रष्टाचाऱ्यांचा खरा चेहरा संघटनेच्या माध्यमातून जनतेसमोर आणायचा असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.भ्रष्टाचार विरोधातील मोहीम उभी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Previous articleसंत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे वारक-यांचा श्वास
Next articleरोजगार हमीची थकीत मजूरी मजूरांच्या खात्यावर जमा : शेतकरी कामगार पक्षाच्या पाठपुराव्याला यश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here