Home जालना उद्योजक व कामगारांनी भाजपा कायम ठेवावा: प्रमोद वाकोडकर ना. दानवे यांच्या प्रचारार्थ...

उद्योजक व कामगारांनी भाजपा कायम ठेवावा: प्रमोद वाकोडकर ना. दानवे यांच्या प्रचारार्थ औद्योगिक वसाहतीत भेटी

44
0

आशाताई बच्छाव

1000369393.jpg

उद्योजक व कामगारांनी भाजपा कायम ठेवावा: प्रमोद वाकोडकर
ना. दानवे यांच्या प्रचारार्थ औद्योगिक वसाहतीत भेटी
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेत उद्योजक आणि कामगारांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून  भारताला महासत्ता करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करावे लागेल त्याकरिता उद्योजक आणि कामगारांनी कमळ निशाणी समोर मतदान करावे असे आवाहन भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांनी केले.

जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारार्थ वाकोडकर यांनी शुक्रवारी ( ता. 10) जालना शहरातील औद्योगिक वसाहतीत भेटी देऊन उद्योजक आणि कामगारांसोबत  संवाद साधला. यावेळी  जालना लघु उद्योग भरतीचे अध्यक्ष किशोर देविदान, पंकज कासलीवाल, सुधीर नाईक, सेजल कदम, भाजपा उद्योग आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष उद्योजक भगवान पाडळे, उपाध्यक्ष तथा समन्वयक अनिल यशवंते, जिल्हाध्यक्ष निखिल चेचाणी ,राजेंद्र तापडिया, सविता कुलकर्णी, ऋचा जोशी, अतिक खान, धनराज काबलीये,  आदींची उपस्थिती होती.

जालना  लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष किशोर देविदान म्हणाले, देशाच्या प्रगतीचा प्रमुख स्त्रोत असलेल्या उद्योगांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सवलती देऊन मदत केली असून ना. दानवे यांचे उद्योजकांना वेळोवेळी सहकार्य आणि पाठबळ राहिले आहे. असे सांगून या निवडणुकीत उद्योजक आणि कामगार ना.दानवेंना आपला भरघोस पाठिंबा कायम ठेवतील. असे देविदान यांनी स्पष्ट केले.
अतिक खान म्हणाले, जालन्यातील उद्योजकांनी कोविड काळात ऑक्सिजनचा पुरवठा केला ना. दानवे यांच्या पाठीशी  उद्योजक खंबीरपणे उभे असून आहेत.

Previous articleभारतामध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे
Next articleशेतकरी कन्येच्या लग्नासाठी समृद्धीचे साखररुपी कन्यादान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here