Home Breaking News 🛑 अभिनेत्री रेखा यांचा बंगला केला सील…! ✍️मुंबई :( विजय पवार...

🛑 अभिनेत्री रेखा यांचा बंगला केला सील…! ✍️मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज ) मुंबई :⭕रेखा यांचा हा बंगला बांद्रा बँडस्टँड परिसरात आहे. त्या

91
0

🛑 अभिनेत्री रेखा यांचा बंगला केला सील…!
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕रेखा यांचा हा बंगला बांद्रा बँडस्टँड परिसरात आहे. त्या बंगल्याच्या बाहेर नेहमी दोन सुरक्षारक्षक असतात. यापैकी एकाला कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढत निघालेला असताना आज महानायक अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत तर अभिनेत्री रेखा यांचा एक सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटीव्ह आल्याने त्यांचा बंगला सील करण्यात आले आहे. त्यांच्या बंगल्याबाहेर कंटेंन्मेंट एरिया असा बोर्ड महापालिकेने लावला आहे.

कोरोना झाल्याची माहिती अमिताभ यांनी स्वत: ट्विटरवरून दिली आहे. त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांचे कुटुंबिय व स्टाफचे स्वॅब घेण्यात आले आहेत, मात्र अजून रिपोर्ट आलेले नाहीत.

कोरोनामुळे बॉलिवूडला मोठा झटका बसला आहे. काही दिवसांपुर्वीच संगितकार वाजिद यांचं निधन झालं आहे. करण जोहर, बोनी कपूर, आमिर खान यांचे कर्मचारी यापुर्वीच पॉझिटिव्ह आले आहेत. तर आज अभिनेत्री रेखा यांचा एक सुरक्षारक्षक पॉझिटिव्ह आलेला आहे. रेखा यांचा हा बंगला बांद्रा बँडस्टँड परिसरात आहे. त्या बंगल्याच्या बाहेर नेहमी दोन सुरक्षारक्षक असतात. यापैकी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर बीएमसीने हा परिसर सॅनिटाईज केला आहे. तसेच या परिसराला कंटेन्टमेट झोन जाहीर केला आहे….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here