Home जालना डॉ.कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी जालन्यात महाविकास आघाडीची महत्वाची बैठक

डॉ.कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी जालन्यात महाविकास आघाडीची महत्वाची बैठक

94

आशाताई बच्छाव

1000293581.jpg

डॉ.कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी जालन्यात महाविकास आघाडीची महत्वाची बैठक
जालना/प्रतिनिधी दिलीप बोंडे 
जालना लोकसभा मतदार संघाचे इंडिया(महाविकास)आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ उद्या 19 एप्रिल शुक्रवार रोजी इंडिया (महाविकास)आघाडीच्या जालना विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. जालना शहरातील अंबड रोडवर असलेल्या गोल्डी लॉन्स मध्ये शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस जालना लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ.कल्याण काळे,आ.कैलास गोरंटयाल, आ.राजेश राठोड,जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख,शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकबाल पाशा,राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख, जालना शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमुद,समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेख नबी शिपोरकर,आपचे जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे,संभाजी ब्रिगेडचे प्रदेश पदाधिकारी संतोष गाजरे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
या महत्त्वाच्या बैठकीस जालना विधानसभा मतदार संघातील इंडिया(महाविकास)आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थीत रहावे असे आवाहन इंडिया(महाविकास)आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleमहाराष्ट्राला संत परंपरेचा गौरवशाली वारसा लाभलेला आहे
Next articleजैन समाजातर्फे आयोजित रक्तदान शिबीरास 77 रक्तदात्यांचे रक्तदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.