Home नाशिक महाराष्ट्राला संत परंपरेचा गौरवशाली वारसा लाभलेला आहे

महाराष्ट्राला संत परंपरेचा गौरवशाली वारसा लाभलेला आहे

25
0

आशाताई बच्छाव

1000293571.jpg

महाराष्ट्राला संत परंपरेचा गौरवशाली वारसा लाभलेला आहे

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. संत विचारावर महाराष्ट्र समृध्द झाला आहे, महाराष्ट्राला संत परंपरेचा गौवरवशाली वारसा लाभला आहे. कोणकोण होते त्यामध्ये? त्यामध्ये होते – मराठी बोलणारे चक्रधरस्वामी, पंजाबपर्यंत देशभ्रमण केलेले संत नामदेव , ब्राह्मणांकडून छळले गेलेले संत ज्ञानेश्वर , ” चोखा डोंगा परि भाव नाही डोंगा ” अशी आर्त वेदना व्यक्त करणारे संत चोखामेळा , भारुडाच्या माध्यमातून जनप्रबोधन करणारे संत एकनाथ आणि रंजल्या गांजल्या माणसांना आपले म्हणणारे संत तुकाराम, अगदी अलीकडच्या काळातील ग्रामस्वच्छतेचा आग्रह धरणारे संत गाडगेबाबा, ग्रामगीता सांगणारे संत तुकडोजी महाराज, या सर्व संतांनी अनमोल असा आध्यात्मिक वारसा आपल्या हवाली केलेला आहे.
संत अवतारी पुरुष होते की नव्ह्ते या वादात मी पडू ईच्छित नाही. परंतू, ती आपल्यासारखीच हाडामांसाची माणसे होती. तरी देखिल अखिल मानव जातीच्या उद्धारासाठी आणि जगाच्या कल्याणासाठीच त्यांनी जन्म वाहीलेला दिसतो. मानवी जीवन हे दुःखाने भरलेले असते. जन्म-मृत्युच्या फे-यात अडकलेल्या मानवी जीवांना ज्ञानाचा प्रकाश दाखवून त्यांना प्रपंचातून मुक्त करण्याचे कार्य संत, महात्मे करत असतात. आयुष्यातल्या क्षणभंगुर सुखाची त्यांना आसक्ती नसते तर शाश्वत आत्मज्ञानाची आस त्यांना लागलेली असते. या आत्मज्ञानाच्या साक्षात्काराने त्यांचे स्वतःचे जीवन उजळून गेलेले असते. तसेच ते समाजासाठीही अहोरात्र झटत असतात. समाजातील अंधश्रद्धा, रुढी, परंपरा, कर्मकांड यांच्या जोखडातून मनुष्यप्राण्यांना सोडवून ईश्वरभक्तीचा ज्ञानमार्ग ते दाखवतात. दीनदुबळ्यांना सहाय्य करणे, अनाथांना आधार देणे, भुकेल्याला अन्न देणे, फळाची अपेक्षा न करता कष्ट करणे, त्यासाठीच संत आपला देह झिजवितात. आपल्या वाणीने, वर्तणुकीने आणि शुद्ध चारित्र्याच्या आचरणाने सर्वसामान्य जनतेसमोर आदर्श ठेवून जनजागृती घडविण्याचे कार्य ते करतात.
अशा संतांचे स्वतःचे आयुष्यही तितकेच खडतर असते. संत जरी समाजासाठी कार्य करणारे असले तरी स्वार्थाने प्रेरित झालेल्या लोकांना ते आवडत नाही व ते संतांना त्रास देऊ लागतात. संतांचा मोठेपणा असा की, ते अशा प्रकारे त्रास देणाऱ्याचा प्रतिवाद न करता आपले कार्य चालूच ठेवतात. त्रास देणाऱ्यांवर न रागावता त्यांचेही कल्याण व्हावे म्हणून झटत रहातात.

स्वरभास्कर -हभप कल्याण महाराज पवार (तळेगाव) शिंदी चाळीसगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here