Home नांदेड लोकशाहीचा पाया मजबूत व भक्कम करण्यासाठी मतदार जनजागृती आवश्यक -तहसीलदार राजाभाऊ कदम

लोकशाहीचा पाया मजबूत व भक्कम करण्यासाठी मतदार जनजागृती आवश्यक -तहसीलदार राजाभाऊ कदम

30
0

आशाताई बच्छाव

IMG_20240128_074356.jpg

लोकशाहीचा पाया मजबूत व भक्कम करण्यासाठी मतदार जनजागृती आवश्यक
-तहसीलदार राजाभाऊ कदम

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर :-लोकशाहीचा पाया मजबूत व भक्कम करण्यासाठी मतदार जनजागृती करणे आवश्यक आहे. नवमतदारांनी आपल्या मतदानाच्या हक्काचे महत्व व पावित्र्य लक्षात घेऊन मतदानाचा हक्क निर्भीडपणे बजावला पाहिजे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाने आपल्यातील नेतृत्वाचा गुण विकसित केला पाहिजे. मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती मोहिमेत योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन देगलूरचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी केले.
ते अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन व राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आणि तहसील कार्यालय देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमातप्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ होते तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.अनिल चिद्रावार , उपप्राचार्य प्रा.उत्तमकुमार कांबळे नायब तहसीलदार बालाजी सुरणार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ. बालाजी कतुरवार यांनी केले तर आभार डॉ. संजय देबडे यांनी मानले . याप्रसंगी कार्यक्रमाधिकारी डॉ. खंदकुरे व्यंकट ,प्रा.काळे विनोद ,प्रा. गणेश क्यादारे ,प्रा.संतोष वानोळे ,प्रा.ज्ञानेश्वर कोकणे, तहसील संतोष हुंडे , हनमंत नुकुलवार, संदीप कांबळे , किशोर महिंद्रकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleवारकरी निघाले निवृत्तीरायाच्या भेटीला. सालाबादप्रमाणे पौष वारी निमित्त
Next articleदेगलुर मधे प्रजासत्ताक दिन हर्षोल्हासात साजरा..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here