Home विदर्भ शांतता समिती बैठक विविध संस्था; संघटनांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी अरोरा

शांतता समिती बैठक विविध संस्था; संघटनांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी अरोरा

82
0

राजेंद्र पाटील राऊत

शांतता समिती बैठक

विविध संस्था; संघटनांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी अरोरा

अकोला 🙁 सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) आगामी सण उत्सव काळात विविध धार्मिक- सामाजिक संस्था संघटनांनी आपापल्या भागातील लोकांचे कोविड लसीकरण करुन घेण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे शांतता समितीच्या बैठकीत केले.

आगामी काळातील सण उत्सवांच्या काळात जिल्ह्यात कोविड या विषाणूजन्य आजाराच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट रितू खोखर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसो- पटोकार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांची उपस्थिती होती.

बैठकीत सुरुवातील शासनाने दिलेल्या निर्देशांची माहिती समिती सदस्यांना संजय खडसे यांनी करुन्ब दिली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील नागरिकांन सण उत्सव काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले. तर जिल्हाधिकारी अरोरा म्हणाल्या की, विविध धार्मिक मंडळांनी आपापल्या भागात लसीकरणाचे आवाहन करुन लोकांनी लसीकरण करुन घ्यावे यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. डॉ. वंदना वसो- पटोकार म्हणाल्या की, दुर्गा मंडळांनी मागणी केल्यास त्यांच्या भागातील नागरिकांसाठी स्वतंत्र सत्र लसीकरण केंद्रावर आयोजित करुन देऊ.

याबैठकीचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन संजय खडसे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here