• Home
  • चामोर्शीच्या बस स्थानकाच्या बांधकामाला लवकरच सुरवात होणार आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या प्रयत्नाने ४ कोटी रुपयांचा निधी अखेर मंजूर

चामोर्शीच्या बस स्थानकाच्या बांधकामाला लवकरच सुरवात होणार आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या प्रयत्नाने ४ कोटी रुपयांचा निधी अखेर मंजूर

आशाताई बच्छाव

IMG-20221123-WA0033.jpg

चामोर्शीच्या बस स्थानकाच्या बांधकामाला लवकरच सुरवात होणार

आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या प्रयत्नाने ४ कोटी रुपयांचा निधी अखेर मंजूर                                    गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

बस स्थानकाच्या बांधकामाच्या तांत्रिक बाबींना मंजुरी नसल्याने थांबलेले होते बांधकाम

येत्या आठवड्यात बांधकामाच्या निविदा निघणार असल्याची दिली माहिती

मुंबई येथे राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री शेखर चन्ने, राज्य परिवहन मुंबई च्या उप महाव्यवस्थापक (बांधकाम) श्रीमती भिलारकर मॅडम यांच्याशी केली चर्चा

काही लोकांना यातील काहीही माहीत नसताना केवळ फोटो काढून घेत मंजुरीचे श्रेय घेणे दुर्दैवी

चामोर्शीच्या बस स्थानकाला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नातून ४ वर्षांपूर्वीच मंजुरी मिळालेली होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे या बस स्थानकाचे बांधकाम सुर होऊ शकलेले नव्हते. आता त्या तांत्रिक अडचणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दूर केल्या असून बस स्थानकाच्या बांधकामाला मान्यता मिळालेली असून ४ कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच या बस स्थानकाचे बांधकाम सुरू होणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.

मात्र काही लोकांना यातील काहीही माहीत नसताना केवळ फोटो काढून घेत आम्हीच मंजुरी आणल्याचे श्रेय घेण्याचे प्रकार सुरु आहेत हे अत्यंत दुर्देवी असल्याचं ते म्हणाले.

मागील ४ वर्षांपूर्वीच चामोर्शीच्या बस स्थानकाला मंजुरी मिळालेली होती परंतु त्यानंतर जागेची उपलब्धता त्यासाठी प्रयत्न करावे लागले. त्यांनतर त्याला यश मिळाले. मध्यंतरीच्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने ३ वर्षे त्यात वाया गेले. आतापर्यंत या स्थानकाच्या बांधकामाचे नकाशे व इतर कागदपत्रांना तांत्रिक मंजूरी मिळालेली नव्हती. याबाबत आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना सातत्याने पाठपुरावा करावा लागला.

याकरिता त्यांनी नुकतीच मुंबई येथे राज्य परिवहन महामंडळाचे , उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री शेखर चन्ने , उपमहाव्यवस्थापक (बांधकाम) राज्य परिवहन मुंबई च्या श्रीमती भिलारकर, कार्यकारी अभियंता, रा प नागपुर श्री खांडेकर यांची मुंबई येथे भेट घेऊन तांत्रिक मंजूरी बाबत चर्चा केली. त्या चर्चेचे फलित मिळालेले असून बांधकामाला मंजूरी मिळालेली आहे. येत्या आठवड्यात बांधकामाच्या निविदा निघणार असल्याची दिली माहिती त्यामुळे आता लवकरच या ठिकाणी बस स्थानकाच्या बांधकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार डॉ देवरावजी होळी यांनी दिली आहे.

anews Banner

Leave A Comment