Home वाशिम भगवान महावीर व डॉ.आंबेडकर मानवतावादी विचाराचे प्रणेते

भगवान महावीर व डॉ.आंबेडकर मानवतावादी विचाराचे प्रणेते

50
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220414-WA0070.jpg

भगवान महावीर व डॉ.आंबेडकर मानवतावादी विचाराचे प्रणेते

वाशिम:(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- अनसिंग,येथील श्री पद्मप्रभ दिगंबर जैन कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभागाच्या वतीने भगवान महावीर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी भगवान महावीर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर इतिहास अभ्यासक डाँ. सचितानंद बिचेवार यांनी भगवान महावीराचा काळ व त्यांची काळाच्या अनुषंगाने सांगितली गेलेली विचारधारा व त्यानंतर गौतम, चक्रधर स्वामी, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,स्वामी विवेकानंद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली मानव मुक्तीची विचारधारा यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात साम्य आहे. महावीर- बुद्धाने सांगितलेला मानवतावाद, स्वातंत्र्य,समता व बंधुभाव हाच या विचार भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारताच्या,भारतातील तमाम मानव जातीच्या कल्याणासाठी वापरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांचे मोठे कल्याण केले हे उदाहरणासह बिचेवार यांनी यावेळी स्पष्ट केले. महावीराच्या विचारातील स्याद्वाद किंवा अनेकांतवाद हा भारतातील विविधता, भारतीय संस्कृतीतील विविधता, वेगवेगळ्या धर्मातील विविधता, वेगवेगळ्या समुदायातील विविधता याला मान्यता देत असून सर्वांच्या विचाराचा आदर आपण केला पाहिजे, आपलाच विचार योग्य आणि सत्य असल्याचे स्याद्वाद मानत नसून एका विचाराला, एका वस्तूला अनेक बाजू असल्याचे स्यादवाद स्पष्ट करत असल्याने भारतीय संस्कृतीच्या संपन्नतेसाठी अनेकांतवाद अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. हाच विचार डॉ.बाबासाहेबांनी सुद्धा भारतीय लोकशाहीच्या उभारणीसाठी प्रत्यक्षात अमलात आणण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. याच वेळी महामानवांचे विचार समजून घेत असताना ते आचरणामध्ये आणणे सुद्धा महत्त्वाचे असल्याचे डॉ. गजानन बनचरे यांनी सांगितले. भारतीय घटना निर्मितीची प्रक्रिया त्याच्यामध्ये डॉ. बाबासाहेबांचे योगदान डॉ. विनोद राठोड यांनी यावेळी उलगडून दाखवून, महामानवांचे विचार आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला यावेळी डॉ.पंकज शर्मा, डॉ. हरीश घोडेकर, प्रा. वैशाली गोरे, डॉ. रंजना जोशी, सुनील वराडे,वृषभ महेशकर, संजय जोगदंड,अनुसया तायडे, विशाल, निलेश,गणेश, नागेश आदि विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here