Home नाशिक पिंगळवाडे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरा.

पिंगळवाडे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरा.

128

राजेंद्र पाटील राऊत

पिंगळवाडे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरा.
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन.
प्रथमता जिल्हा परिषद शाळा पिंगळवाडे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी रामदास भामरे होते. यावेळी लहान मुलांनी बाबासाहेबांन बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मुख्याध्यापक धुडकु गांगुडेॅ, मनीष शेवाळे,राजेंद्र देवरे, निकम मॅडम व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी उत्सव समिती अध्यक्ष विनोद गांगुर्डे तर नारळ वाढविण्यासाठी मोतीराम गांगुर्डे होते. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच लताबाई भामरे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. गावातील नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.याची सर्व रूपरेषा व सूत्रधार अरुण बागुल यांनी सांभाळली. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार नामपुर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कृष्णा भामरे यांनी केले. तसेच बाबासाहेबांबद्दल व गावाच्या एकते बद्दल कृष्णा भामरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन केदा भामरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.त्यात दिलीप भामरे, शामराव भामरे, मुरलीधर जाधव, भाऊसाहेब भामरे, रविंद्र भामरे,गंगाधर भामरे,इ.
तसेच समाज बांधवांनी आपल्या घरांवर धम्म ध्वज लावुन आनंद साजरा केला.सायंकाळी चार वाजता गावातून मिरवणूक काढण्यात आली महिलांनी व पुरुषांनी आनंदोत्सव साजरा केला या कार्यक्रमासाठी कसमादे अग्रो प्रोडूस चे चेअरमन गणेश पवार यांची उपस्थिती विशेष होती. या कार्यक्रमासाठी गणेश पवार यांनी समाज बांधवांना आपल्या स्व खर्चातुन बाबासाहेबांचे प्रतिमा असलेले साधारण 40 टि शर्ट देण्यात आले. या कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधव उपस्थित होते . त्यात माधव गांगुर्डे, कैलास गांगुर्डे, शिवाजी गांगुर्डे, अविनाश निकम, वैभव गांगुर्डे, देवा गांगुडेॅ, नवल गांगडेॅ,, राजू निकम, यशवंत साळवे,करण साळवे,महेश गांगुडेॅ, ऋषिकेश गांगुर्डे, राजु निकम इ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला…..

Previous articleभगवान महावीर व डॉ.आंबेडकर मानवतावादी विचाराचे प्रणेते
Next articleतामसवाडी येथे महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.