Home नाशिक सोयगाव/दाभाडी शिवरोड चौफुलीवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव परिसरातील सर्व समाज...

सोयगाव/दाभाडी शिवरोड चौफुलीवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव परिसरातील सर्व समाज बांधवाच्यां उपस्थितीत प्रचंड उत्साहाचे वातावरणात संपन्न झाली….

86
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220415-WA0026.jpg

सोयगाव/दाभाडी शिवरोड चौफुलीवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव परिसरातील सर्व समाज बांधवाच्यां उपस्थितीत प्रचंड उत्साहाचे वातावरणात संपन्न झाली….
वार्ताहर-शिवनेरी चौक दाभाडी शिवार सविस्तर व्रुत असे की काल दिनांक-14/एप्रिल रोजी मालेगांव तालुक्यातील सोयगाव/दाभाडी शिवरोड चौफुलीवर दैवत प्रतिष्ठान मित्रमंडळा तर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक तथा आई प्रतिष्ठान मित्रमंडळाचे जाणते राजे मा.श्री.निलेश दादासाहेब काकडे, मालेगांव महानगरपालिकेचे विद्दमान उपमहापौर श्री.निलेश दादा आहेर,सोयगाव कार्पोरेशनचे युवा नेते व चंद्रमा हार्डवेअरचे प्रतिष्ठित डिलर श्री.भुषण दादा बच्छाव,शिवसेनेचे युवा लिडर श्री.गोंडु दादा पवार,श्री.रवी दादा निकम,पवन दादा पाटील,शेखरभाऊ जाधव व दलित समाजाचे जेष्ठ नेते श्री.तात्यासाहेब अहीरे या सर्व प्रमुख अतिथीच्यां शुभहस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांचे प्रतिमेसह छत्रपती शिवाजी महाराज,शाहु महाराज,महात्मा जोतिबा फुले,आण्णाभाऊ साठे,महाराणा प्रताप,भगवान एक लव्य,व लोक माता अहिल्याबाई होळकर या महापुरुषांचे प्रतिमेचे देखील एकाच वेळेत प्रतिमा पुजन करुन दैवत प्रतिष्ठान ग्रुप तर्फे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्सव कार्यक्रमात आलेल्या पाच ते दहा वयोगटातील लहान लहान मुलांना शालेय उपयोगी भेट वस्तू म्हणून उपस्थित सर्व प्रमुख अतिथी यांचे हस्ते जवळजवळ 100 मुलांना प्रत्येकी दोन वही व एक पेन वाटत करत असताना मात्र लहान मुलं मुली व त्यांचे सोबत आलेले पालक आणि परिसरातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्वच समाजातील महिला व पुरुष यांचे चेहऱ्यावरील हर्ष आनंदीत प्रचंड असा उत्साह बघून जणु काही आजच्या ऐतिहासिक अशा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने एक प्रकारे जातीय सलोखा,एकता,प्रेम,प्रज्ञा,शिल या सारख्या अनेक कारणांनी संपूर्ण परिसरामध्ये खरोखर कौतुकास्पद विषयाला खुप मोठे उधाण आल्याचं दिसून येत होते.
इतकेच नव्हे तर कार्यक्रमा प्रसंगी लहान मुलांना बक्षीस वाटप समयी उपस्थितांमध्ये जल्लोषपुर्ण असे वातावरण बघून प्रमुख अतिथीनां देखील त्यांच्या आनंदाचा मोह आवरता आला नाही की काय म्हणून शिवसेना पक्षाचे कनखर युवा नेते मा.श्री.निलेश दादा काकडे,उपमहापौर श्री.निलेश दादा आहेर,शिवसेनेचे युवा नेते श्री.भुषण दादा बच्छाव व श्री.गोडुं दादा पवार यांनी खरोखर यशस्वी पणे परिश्रम घेणारे कार्यक्रमाचे संयोजक सर्वश्री.परिसरातील शिवसेनेचे युवा नेते श्री.रवीदादा निकम,पवन पाटील,शेखरभाऊ जाधव तसेच दैवत प्रतिष्ठान मित्रमंडळाचे मुख्य संस्थापक श्री.सचिन दादा अहिरे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.सुरेशभाऊ गायकवाड,बबलु जगताप,बंडु पवार,खुशाल उशीरे,अविनाश उशीरे,सागर उशीरे,आकाश खैरनार,अनिल बनसोडे,यासह दैवत प्रतिष्ठान मित्रमंडळातील सर्व सहकारी मित्रांचे देखील अगदी तोंड भरून कौतुक केले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने परिसरातील उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.
तसेच आई प्रतिष्ठान मित्रमंडळाचे मुख्य संस्थापक तथा क्रुषी मंत्री मा.नामदार दादासाहेब यांचे खंदे समर्थक श्री.अर्जुन दादा पवार व श्री.किशोर शिंदे यांनी दिलेल्या सदिच्छा भेटी सह दिवसभर परिसरातील वार्ड,प्रभाग,विभाग,शहर व तालुक्यातील राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक सांस्कृतिक या सारख्या विविध क्षेत्रातील अनेक पदाधिकारी हे कार्यक्रमाच्या ठिकाणी आवर्जून सदिच्छा भेट देत असताना दैवत प्रतिष्ठान ग्रुपचे संस्थापक श्री.सचिन दादा अहिरे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.सुरेशभाऊ गायकवाड हे मित्रमंडळाच्या वतीने सर्वांचे आभार मानीत असताना अत्यंत उत्साहवर्धक व जल्लोषपुर्ण अशा खेळीमेळीच्या वातावरणात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्रमाची मोठ्या धुमधडाक्यात सागंता करण्यात आली.
_सिनियर रिपोर्टर_
_सुभाष कचवे उर्फ दादा मामा_
युवा मराठा न्युज नेटवर्क चँनल
मालेगांव महाराष्ट्र

Previous articleदापोडीत फिरंगाई देवीचा उत्सव उत्साहात
Next articleभगवान महावीर व डॉ.आंबेडकर मानवतावादी विचाराचे प्रणेते
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here