Home पुणे दापोडीत फिरंगाई देवीचा उत्सव उत्साहात

दापोडीत फिरंगाई देवीचा उत्सव उत्साहात

95
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220414-WA0113.jpg

दापोडीत फिरंगाई देवीचा उत्सव उत्साहात

दापोडी ः(उमेश पाटील प्रतिनिधी)- विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून दापोडी येथील ग्रामदैवत श्री फिरंगाई देवी उत्सवास सुरुवात झाली.
यात्रेच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. उत्सवाच्या निमित्ताने परिसरात रहाट पाळणे, मेरी गो राउंड, बालकांसाठी रेल्वे, विविध खाद्यपदार्थांचे व खेळण्याची स्टॉल होते. ता. १३ बुधवारी सायंकाळी ५ वाजता श्रींच्या पालखीचे कुरकुं भकडे प्रस्थान झाले. गुरुवारी सकाळी १० वाजता पालखीचे आगमन झाले. यावेळी फिरंगाई देवीची पूजा सौ. रूपाली संजय काटे सौ. सपना अमित काट सौ . सिद्धता प्रणव काटे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पालखीचे चौकाचौकात भाविकांच्या वतीने स्वागत करण्यात आले. फिरंगाई मंदिरापासून पालखी दापोडी चौका मधून आंबेडकर पुतळा, शिवाजी चौक, वरील आळी या मार्गाने चव्हाट्यावर मुक्काम करण्यात आला. सायंकाळी सात वाजता माजी महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली श्रींच्या पालखी छबिना सोहळ्याचे उद्घाटन राजू बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उत्सव कमिटी अध्यक्ष गणेश काटे, बाळासाहेब काटे, सचिव राहुल फलके, खजिनदार ऋषभ काटे उपस्थित होते.
ता.१५ शुक्रवार रोजी भव्य कुस्तीचा आखाडा चे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी पै. बाला रफिक शेख विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. योगेश पवार यांच्यामध्ये कुस्ती रंगतदार होणार आहे. पुरुष कुस्ती बरोबरच महिला कुस्तीचेही आयोजन करण्यात आले आहे महिला कुस्ती मध्ये पै. सही कस्पटे विरुद्ध पै. सिद्धी दाभाडे, पै. स्पंदन मोहिते विरुद्ध पै. खुशी देवरे यांच्यात लढत होणार आहे. यावेळी कुस्त्या राष्ट्रीय पंचाच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here