Home पुणे पुणेतल्या कृष्णा चौकात डाँ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

पुणेतल्या कृष्णा चौकात डाँ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

65
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220414-WA0112.jpg

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
नवी सांगवी : भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रेरणेतून व माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनातून कृष्णा चौक येथे प्रभागातील ज्येष्ठ नागरिक,कार्यकर्ते,उद्योजक माऊलीशेठ जगताप व सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोनपे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करूण त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.त्यांनी देशासाठी लिहिलेल्या सविधानाचे आणि त्यांनी जीवनात केलेले संघर्षचे काही मान्यवरांनी भाषण रुपी नागरिकांना संबोधित केले.
त्यानंतर
१) ऐश्वर्या गंगावलेयांना दुबई मध्ये उत्कृष्ट चित्र काढल्याबद्दल त्यांना मोठा पुरस्कार मिळाला आहे.
२)महावितरण कडून सांगवी डिव्हिजन विद्युत विभागाला उत्कृष्ट कार्याबद्दल प्रथम क्रमांक मिळाला आहे.
३)डी एन जी या डान्स ग्रुपनेतीन जिल्ह्यांमध्ये डान्स या स्पर्धेत प्रथम क्रमांक ठेवल्या आहे.
४)सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी सांगवी ठाणेया परिसरात पोलिसी कार्यातून उकृष्टक कार्य केले.
५) सांगवी,नवी सांगवी,पिंपळे गुरव येथी 125 संयुक्त जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी बिनविरोध विजय गायकवाड यांची निवड झाली.
अशा या पाच मान्यवरांचे शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी उद्योजक माऊली जगताप सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोनपे,नगरसेवक सागर आंघोळकर,अंबरनाथ कांबळे,राजेंद्र राजापुरे,संजय मराठे,सखाराम रेडेकर,बाळासाहेब देवकर,राहुल काकडे,अण्णा तावरे,सुनिल कोकाटे,संदीप दरेकर,राजेश नितनवरे,दयानंद चव्हाण,गणेश बनकर,प्रवीण पाटील,भाऊसाहेब कानकात्रे,ज्ञानेश्वर खैरे,रवी खोकर,रमेश चौधरी,सुदाम मराडे आधी मान्यवर व ज्येष्ठ नागरिक उपस्थित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here