Home गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील प्राणहिता नदीच्या तीरावर प्रथेप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या पुष्कर...

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील प्राणहिता नदीच्या तीरावर प्रथेप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या पुष्कर मेळाव्याला महाराष्ट्र राज्यातील हजारो भाविक भक्त यांनी उपस्थित राहून शाही स्नान लाभ घ्यावा!!- !!आमदार डॉ देवराव होळी!!

54
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220414-WA0083.jpg

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील प्राणहिता नदीच्या तीरावर प्रथेप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या पुष्कर मेळाव्याला महाराष्ट्र राज्यातील हजारो भाविक भक्त यांनी उपस्थित राहून शाही स्नान लाभ घ्यावा!!- !!आमदार डॉ देवराव होळी!!
गडचिरोली,( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
बारा वर्षांनी आलेल्या या पुष्कर पर्वामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. आजपासून सुरू होणारा पुष्कर_पर्व २३ एप्रिल २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी सोहळ्याला उपस्थित राहून भाविकांसाठी केलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. भाविकांच्या सोयीसाठी जागोजागी उभारण्यात आलेल्या #महाप्रसाद वाटप केंद्रांना भेट देऊन भाविकांना पुष्कर पर्वाकरिता शुभेच्छा दिल्या.व कृषी विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहून उपस्थित शेतकरी शेतमजूर कामगार यांना मार्गदर्शन केले जिल्हा प्रशासनाने याठिकाणी येणाऱ्या भाविकांची उत्तम सोय केली असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. यावेळी बोलतांना गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी महाराष्ट्र राज्यातील तमाम भाविक भक्त यांनी पुष्कर येथील शाही स्नान लाभ घ्यावा असे आवाहन केले
याप्रसंगी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना , एकनाथ शिंदे , अहेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम , गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उप-महानिरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक अनुज तरे आणि गडचिरोली जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी आणि पुष्कर पर्वात स्नान करण्यासाठी आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रामुख्यानं आमदार डॉ देवराव होळी यांचे सोबत भाजप नेते दामोदर अर्गेलावार माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रा रमेश बारसागडे. बाजार समितीचे सभापती सतीश भाऊ गंजीवार ,भाजपा युवा नेते संदीप भाऊ राचरलावार , शारीक भाऊ शेख व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleअखेर हातपंपाचे काम सुरु।
Next articleपुणेतल्या कृष्णा चौकात डाँ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here